टोलमाफीसाठी आरपीआयचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:47 AM2021-09-10T04:47:18+5:302021-09-10T04:47:18+5:30

सातारा : आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यावर वाहनांना टोल द्यावा लागत आहे, तो तत्काळ बंद करण्यात यावा, या ...

RPI's agitation for toll exemption | टोलमाफीसाठी आरपीआयचे आंदोलन

टोलमाफीसाठी आरपीआयचे आंदोलन

Next

सातारा : आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यावर वाहनांना टोल द्यावा लागत आहे, तो तत्काळ बंद करण्यात यावा, या मागणीसाठी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी आंदोलनात टोल नाके बंद करा, अशा आक्रमक घोषणाही दिल्या. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

आनेवाडी टोलनाका बंद करा, ही इच्छा सातारकरांची असली तरी याचा निर्णय हा केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने तेच निर्णय घेवू शकत आहेत. मात्र, या टोलनाक्यावरील अरेरावी, दमबाजी तसेच रस्त्याच्या दुरवस्थेने सातारकर त्रस्त झाले आहेत. सातारकरांना या टोलमधून वगळण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. या टोलनाक्याची मुदत संपूनही त्याला मुदतवाढ मिळाली जात आहे. मात्र, राजकीय वरदहस्ताने आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन अरेरावी करत असते अन् सर्वसामान्यांला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सातारकरांच्या मनात या टोलनाक्याबाबत असंतोष निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आक्रमक होत आनेवाडी येथे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, दि.८ रोजी प्रशासनाबरोबर चर्चा झाल्याने हे आंदोलन स्थगित करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.

फोटो नेम : ०९जावेद

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआयने आंदोलन केले. (छाया : जावेद खान)

Web Title: RPI's agitation for toll exemption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.