२०० कोटींची योजना १४०० कोटींंवर : उरमोडीच्या सिंचन कामावर १०६२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:31 AM2018-04-10T00:31:49+5:302018-04-10T00:31:49+5:30

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना

 Rs. 200 crores plan for Rs. 1400 crores: Rs. 1062 crores spent on Urmodi irrigation works | २०० कोटींची योजना १४०० कोटींंवर : उरमोडीच्या सिंचन कामावर १०६२ कोटी खर्च

२०० कोटींची योजना १४०० कोटींंवर : उरमोडीच्या सिंचन कामावर १०६२ कोटी खर्च

Next
ठळक मुद्देपुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची कामे अद्यापही अपूर्ण

नितीन काळेल ।
सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना २१२.०७ कोटींची होती. आता त्याची सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे. या योजनेतील कालव्याची कामे

गतीने सुरू असतानाही अद्याप प्रकल्पग्रस्त स्थलांतरित होणाºया काही गावठाणातील कामे अपूर्ण आहेत.
राज्यात १९९५ मध्ये युती शासन सत्तेत आल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धरणाची कामे हाती घेण्यात आली. त्यावेळी सातारा तालुक्यातील परळीजवळ उरमोडी नदीवर धरण बांधण्याचा निर्णय झाला. उरमोडी प्रकल्पांतर्गत धरणाचे काम पूर्ण झाले असून, २०१० च्या जून महिन्यापासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे.

उरमोडी नदीवर असणारे हे धरण ५०.१० मीटर उंचीचे असून, १८६० मीटर लांबी आहे. या धरणात एकूण ९.९६ टीएमसी इतका पाणीसाठा होत आहे. या धरणातील पाण्यावर माण, खटाव आणि सातारा तालुक्यातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. त्यासाठी आवश्यक असणाºया कालव्याची कामे अद्यापही सुरू आहेत. या सिंचन प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यताप्राप्त किंमत २१२.०७ कोटी (२०००-२००१ ची दरसूची) होती. तर अद्ययावत सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे.

दरवर्षी शेतकºयाला हेक्टरी चार हजार खर्च
उरमोडी धरणावर अवलंबून असणाºया पाणी योजनेमुळे माण आणि खटाव तालुक्याला मोठा फायदा होणार आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरवर होणारे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. तसेच उन्हाळ्यातही सिंचनाची सुविधा होणार आहे. या योजनेसाठी शेतकºयाला दरवर्षी हेक्टरी अवघा चार हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच सध्या या सिंचन योजनेतून अवघे ३५०० हेक्टर क्षेत्र भिजत आहे. माणमध्ये कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी सुरू आहे. कामे पूर्ण नसल्याने अनेक ठिकाणी ओढे, तलावात पाणी सोडण्यात येत आहे.

धरणातील पाण्याचा वापर सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याचे नियोजन आहे; पण सध्या कालव्यांची कामे सुरू असल्याने फक्त ४ ते ५ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे धरणात बरेच पाणी शिल्लक राहते. येत्या दोन वर्षांत संपूर्ण पाण्याचा वापर होईल, असे उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड यांनी सांगितले.

Web Title:  Rs. 200 crores plan for Rs. 1400 crores: Rs. 1062 crores spent on Urmodi irrigation works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.