ओबीसी आरक्षणासाठी रासपचे साताऱ्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:47+5:302021-07-05T04:24:47+5:30
सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रविवारी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी आरक्षणावरील स्थगिती उठत नाही ...
सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रविवारी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
रासपच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी रविवारी राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार साताऱ्यात आंदोलन झाले. साताऱ्यातील बाँबे रेस्टॉरंट चौकात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, जिल्हा सरचिटणीस डॉ. रमाकांत साठे, संतोष ठोंबरे, संदीप धुमाळ, महेश जिरंगे, नीलेश भोईटे, दादासाहेब दोरगे, पंकज भोसले, प्रकाश खरात, सुनील माने आणि हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष पवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
दरम्यान, राज्य शासनाने ओबीसी आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींची पूर्तता करावी, ओबीसी समाजाची योग्य ती माहिती न्यायालयात सादर करावी, ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
फोटो दि.०४सातारा रासप फोटो...
फोटो ओळ : साताऱ्यातील बाँबे रेस्टॉरंट चौकात रविवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)
\\\\\\\\\\\\\\\\\\