आरटीई प्रवेशाचा सर्व्हर डाऊनच!

By प्रगती पाटील | Published: April 15, 2023 03:19 PM2023-04-15T15:19:07+5:302023-04-15T15:20:29+5:30

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना सर्व्हर डाऊन असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

rte access server down in satara | आरटीई प्रवेशाचा सर्व्हर डाऊनच!

आरटीई प्रवेशाचा सर्व्हर डाऊनच!

googlenewsNext

प्रगती जाधव पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील दुर्बल वंचित घटकातील बालकांना प्रवेश देताना त्यात कुठलाही मानवी हस्तक्षेप होऊ नये व  पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा या उद्देशाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना सर्व्हर डाऊन असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी विनाअनुदानित स्वयंअर्थसायक शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश निश्चिती करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील २१७ शाळांमध्ये १ हजार ८२३ जागांसाठी तब्बल साडेचार हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यस्तरीय लॉटरीतून बालकांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत एसएमएसही प्राप्त झाले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: rte access server down in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.