कोविड लसीकरणाच्या अफवा ओसरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:34+5:302021-06-02T04:28:34+5:30

सातारा : कोरोना प्रतिबंधक लसीबाबत प्रारंभी अनेक अफवा शहरी आणि ग्रामीण भागात पसरल्या होत्या. मात्र कोविड रोखण्यासाठी एकमेव आशेचा ...

Rumors of covid vaccination have spread | कोविड लसीकरणाच्या अफवा ओसरल्या

कोविड लसीकरणाच्या अफवा ओसरल्या

Next

सातारा : कोरोना प्रतिबंधक लसीबाबत प्रारंभी अनेक अफवा शहरी आणि ग्रामीण भागात पसरल्या होत्या. मात्र कोविड रोखण्यासाठी एकमेव आशेचा किरण असल्याने सातारकरांनी लसवंत होण्याचं ठरवलं. सध्या लसीकरण घेण्यासाठी रांग लावून नागरिक गर्दी करू लागले आहेत.

सातारा जिल्ह्यासह देशभरात १६ जानेवारी रोजी कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला १०० लसींची ९ सेशन झाली. नंतर त्यात १६ पर्यंत वाढ करण्यात आली. आत्तापर्यंत ५ हजार ९०० लाभार्थ्यांना लसीकरण होणे अपेक्षित होते. मात्र त्यांपैकी ४ हजार ८९१ लाभार्थ्यांनीच लसीकरण करून घेतले. म्हणजे सुमारे एक हजार लाभार्थ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले होते.

हे काही प्रमाणात मान्य केले तरी लसीकरणाबाबत गैरसमजातून निर्माण झालेली भीती हेही एक प्रबळ कारण असल्याची आरोग्य कर्मचाऱ्यांत दबक्या आवाजात चर्चा आहे. सरकारी कर्मचारी असल्याने शासनाच्याच लसीकरणाच्या अनुषंगाने असलेल्या गैरसमजाबाबत थेट माध्यमांपुढे बोलण्यास कोणीही पुढे येत नाही. या प्रतिबंधक लसीमुळे हार्मोन्समध्ये बदल घडत असल्याची, नपुसंकत्व येते, वांझपण येऊ शकते, याबरोबरच हृदयाची गती कमी करून ते बंदही पडू शकते या व अशा काही अफवा सर्वदूर पसरल्या होत्या. सरकारी आरोग्य यंत्रणेतील घटकांचे खासगी ग्रुप व काही समाजमाध्यमांवर पोस्टच्या माध्यमातून फिरत होत्या. हे प्रकार आता संपुष्टात आले असून सातारकर लसीच्या प्रतीक्षेत आहेत.

चौकट

काय आहेत अफवा...

अ. आजारी पडते

लस घेतल्यानंतर व्यक्ती आजारी पडू शकते. त्यामुळे जिवाला धोका निर्माण होत असल्याची अफवा पसरली होती. विशेष म्हणजे ही अफवा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत पसरली होती.

ब. हृदयाची गती मंदावते

कोरोनाची लस घेतल्यानंतर काही लोकांच्या हृदयाची गती मंदावून त्यांचा मृत्यू होतो. याबरोबरच रक्तात गाठी होऊन मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अनेकांनी याची उदाहरणे असल्याच्याही बतावण्या केल्या होत्या.

क. नपुंसकत्व अन् वंध्यत्व

काही भागांमध्ये फ्रंटलाईन वर्कर असणाऱ्या पुरुषांनी लसीकरण करण्यास विरोध केला. का नको याचे कारण ऐकल्यावर मात्र आरोग्य यंत्रणा थक्क झाली. या पुरुषांच्या मते लस घेतल्याने नपुंसकत्व आणि वंध्यत्व येते.

गावकरी संभ्रमात

१. कोरोना प्रतिबंध लस घेतली की माणूस आजारी पडतो, त्यातून अनेक आजार होतात अशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे मी सुरुवातीला लस घेतली नाही. आता लस घेण्याची तयारी आहे, तर लस उपलब्ध नाही.

- हरिविजय बाबर, पंताचा गोट, सातारा

२.

कोरोनाची लस घेण्यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी अनेक अफवा कानांवर आल्या. पण प्रतिबंधात्मक लस हा एकमेव उपाय असल्याने मी लस घेतली आणि मला कुठलाच त्रास झाला नाही.

- सुनंदा रेळेकर, पवार कॉनली, शाहूपुरी

अधिकारी म्हणतात

कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्णत: सुरक्षित आहे. मी स्वत: ही प्रतिबंधक लस घेतली आहे. आत्तापर्यंतच्या लाभार्थ्यांपैकी कोणालाही मोठ्या प्रमाणात साईड इफेक्ट झालेला नाही. शासनाने दिलेली लस आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आणि कोविडला प्रतिबंध करण्यास उपयुक्त अशीच आहे.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Rumors of covid vaccination have spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.