रात्रीस खेळ चाले... लोखंडी खांब गुल्ल झाले!

By admin | Published: July 6, 2017 04:20 PM2017-07-06T16:20:55+5:302017-07-06T16:26:25+5:30

भुरट्या चोरट्यांची करामत

Run the game in the night ... the iron pillars are gone! | रात्रीस खेळ चाले... लोखंडी खांब गुल्ल झाले!

रात्रीस खेळ चाले... लोखंडी खांब गुल्ल झाले!

Next

 आॅनलाईन लोकमत 

सातारा, दि. ६ : साताऱ्यातून जाणारा पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर भंगार चोरटे पुन्हा सुसाट झाले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या चोरट्यांनी महामार्गालगत असणाऱ्या बहुतांश सुरक्षा जाळ्यांमधील लोखंडी खांब चोरून नेले असल्याचे चित्र दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्ग साताऱ्यातून जातो, त्या मार्गावर वाढे फाटा परिसरात महामार्ग आणि सेवा रस्ता यांच्यामध्ये सुरक्षा रक्षक जाळी बसविण्यात आल्या आहेत. या जाळीचा आता सांगाडा शिल्लक राहिला आहे. यात असणारे लोखंडी खांब भुरट्या चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे.

रात्री उशीरा सेवा रस्त्यांवरून स्थानिक सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने या जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. शे पाचशे रूपयांत हे खांब विकुन भुरट्या चोरट्यांनी सामान्यांचे आयुष्य धोक्यात घातले आहे.

Web Title: Run the game in the night ... the iron pillars are gone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.