कऱ्हाडात धावपटू सुफिया यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:46+5:302021-01-25T04:39:46+5:30
दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली अशा ६ हजार किलोमीटरच्या सद्भावना दौडदरम्यान त्यांचे कऱ्हाड शहरात आगमन झाले. त्यावेळी कऱ्हाड ...
दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली अशा ६ हजार किलोमीटरच्या सद्भावना दौडदरम्यान त्यांचे कऱ्हाड शहरात आगमन झाले. त्यावेळी कऱ्हाड जिमखाना संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा, सचिव सुधीर एकांडे, विवेक ढापरे, सूचिता शहा, विवेक कुंभार, सचिन गरुड, प्रमोद गरगटे, अभिजीत घाटगे, दीपक शहा, शंकर चव्हाण, डॉ. चिन्मय विंगकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिमखान्याच्या कार्याचा विवेक ढापरे यांनी परिचय करून दिला. रणजी सामने, संगीत महोत्सव, मराठी साहित्य संमेलन, बॅडमिंटन, टेबल टेनिस मॅचेस इत्यादी अनेक उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. सुफिया यांनी यापूर्वी काश्मीर ते कन्याकुमारी, इंडिया गेट दिल्ली ते गेट वे ऑफ इंडिया, दिल्ली-आग्रा-जयपूर-दिल्ली अशा दौड विक्रमी वेळेत पूर्ण करून अनेक विक्रम गिनीज बुकमध्ये प्रस्थापित केले आहेत.
सध्याची दौड त्या रोज ५५ किलोमीटर अंतर धावून १३५ दिवसांत पूर्ण करणार आहेत. सायकलपटू असलेले त्यांचे पती विकास या दौडीचे नियोजन त्यांच्या सोबतीने करत आहेत.
डॉ. चिन्मय विंगकर यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत घाटगे यांनी आभार मानले.
फोटो : २४केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाड येथे जिमखाना संस्थेच्या वतीने विख्यात धावपटू सुफिया यांचा संस्थेचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.