दडी मारलेला पाऊस बरसू लागला ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:31 PM2017-08-24T16:31:03+5:302017-08-24T16:32:48+5:30

मलटण : पावसाने दडी मारल्याने नांदल, निंभोरे, वडजल, काशीदवाडी फरांंदवाडी या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असतानाच शनिवारपासून पावसाने पुनरागमन केले आहे. या पावसात जोर नसला तरी करपून चाललेल्या पिकांसाठी हा पाऊस नवसंजीवनी देणारा ठरत आहे. यामुळे शेतकºयांच्या चेहºयावर नवा उत्साह पहायला मिळत आहे.  

Runny rain rains! | दडी मारलेला पाऊस बरसू लागला ! 

दडी मारलेला पाऊस बरसू लागला ! 

Next
ठळक मुद्देकरपून चाललेल्या पिकांसाठी संजीवनी शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण 

मलटण : पावसाने दडी मारल्याने नांदल, निंभोरे, वडजल, काशीदवाडी फरांंदवाडी या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असतानाच शनिवारपासून पावसाने पुनरागमन केले आहे. या पावसात जोर नसला तरी करपून चाललेल्या पिकांसाठी हा पाऊस नवसंजीवनी देणारा ठरत आहे. यामुळे शेतकºयांच्या चेहºयावर नवा उत्साह पहायला मिळत आहे.  

फलटण तालुक्यात  पावसाअभावी जुलै महिना पूर्णपणे कोरडा गेला होता. त्यानंतर खरीप हंगामातील पिके वाया गेली होती. काही शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर ही पावसाने चांगलीच ओढ दिल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त दिसत होते.

पण, उशिरा का होईना शेतकºयांच्या हाकेला वरूणराजा धावला आणि अगदी अंतिम टप्प्यात पावसाने शनिवारपासून हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. या पुढेही पाऊस पडला तर खरीप पिकांबरोबर ऊस लागणीसाठी त्याचा फायदा होणार आहे. पाऊस सुरु असल्याने शेतकरी पुढच्या कामाच्या तयारीत आहेत.

Web Title: Runny rain rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.