ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक; रुग्णालयात उपचार सुरू होते
By नितीन काळेल | Updated: February 25, 2025 10:29 IST2025-02-25T10:12:43+5:302025-02-25T10:29:15+5:30
Bhagwanrao Gore Passes Away: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक; रुग्णालयात उपचार सुरू होते
सातारा: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा, वय ७६) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी माण तालुक्यातील बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
|| दुःखद वार्ता ||
— Jaykumar Gore (@Jaykumar_Gore) February 24, 2025
माझे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दादांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”
भावपूर्ण… pic.twitter.com/Mo584C0wiR
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचे मंगळवारी पहाटेचे सुमारास निधन झाले. बोराटवाडी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. सायंकाळपर्यंत पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सायंकाळी चारनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भगवानराव गोरे हे बोडके ग्रामपंचायतचे माजी सरपंच होते. त्यांच्या पश्चात अंकुश, जयकुमार, शेखर गोरे ही मुले तर सुरेखा ही कन्या आहे.