एस. टी. अन् रेल्वे मोजक्या प्रवाशांना घेऊनच धावताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:08+5:302021-06-10T04:26:08+5:30

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होऊ लागल्यानंतर राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला काहीअंशी परवानगी दिली आहे. यामुळे ...

S. T. Other trains run with few passengers | एस. टी. अन् रेल्वे मोजक्या प्रवाशांना घेऊनच धावताहेत

एस. टी. अन् रेल्वे मोजक्या प्रवाशांना घेऊनच धावताहेत

Next

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होऊ लागल्यानंतर राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला काहीअंशी परवानगी दिली आहे. यामुळे एस. टी.च्या फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांनी अजूनही पाठ फिरवल्याचे दिसते. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातून दिवसभरात पन्नास टक्के प्रवासी वाहतूक होत आहे.

राज्यभरात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. यामध्ये सातारा जिल्ह्यात दररोज सरासरी दोन हजारांच्या घरात रुग्णसंख्या वाढत होती. यामुळे कोरोनाची ही साखळी कशी रोखायची, हा प्रश्न प्रशासनाला सतावत होता. कोरोना रोखायचा असेल तर बाधित भागातून होणारी लोकांची ये-जा थांबली पाहिजे, हा विचार करून राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद केली. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. आणि रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनीही विनाकारण प्रवास करणे बंद केले होते.

आता बाधितांची संख्या कमी होत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे जिल्हांतर्गत प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे एस. टी. महामंडळाने पुणे, मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर या मार्गांवर सातारा आगारातून फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने पुणे आणि मुंबई मार्गावर दोन तासाने गाड्या सोडाव्या लागत आहेत.

चौकट

कोयना एक्सप्रेस वीस दिवसांपासून बंद

सातारकरांसाठी सध्या फक्त निझामुद्दीन गोवा एक्स्प्रेस, दादर चालुक्य एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस याच रेल्वेगाड्या सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी व दररोज धावणारी कोयना एक्सप्रेस गेले वीस दिवस बंद करण्यात आली आहे.

चौकट

प्रवाशांअभावी दोन तासांनी फेरी

सातारा-पुणे, सातारा-बोरिवली, सातारा-मुंबई या मार्गांवर दररोज सरासरी पंधरा मिनिटांनी गाडी सुटत असते. मात्र, सध्या प्रवासी फारसे फिरकत नसल्याने या सेवांवर परिणाम झाला आहे. कमी प्रवाशांना घेऊन गाडी सोडणे परवडत नसल्याने दोन तासांनी गाडी सोडली जात आहे.

चौकट...

अत्यावश्यक कामासाठीच प्रवास

कोट

सातारा जिल्हयातील सातारा, कऱ्हाड, लोणंद तसेच वाठार, कोरेगाव याठिकाणी थांबा असणारी कोयना एक्सप्रेस व सह्याद्री एक्सप्रेस लवकरात लवकर पुन्हा सुरु करावी.

- संजय हिरे, कऱ्हाड. रेल्वे प्रवासी

कोट

सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अनलॉक झाले असून, जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत आहे. मात्र, सर्वात स्वस्त प्रवासाचे साधन असणारी ट्रेन बंद असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

- राजेंद्र जाधव, सातारा. रेल्वे प्रवासी.

कोट..

सातारा रेल्वे स्थानक शहरापासून लांब असल्याने सातारकरांसाठी एस. टी. हेच सोयीचे साधन आहे. मात्र, एस. टी.च्या फेऱ्या आणखीन वाढविल्यास नागरिकांची सोय होणार आहे.

- दिलीप कांबळे,

एस. टी. प्रवासी

कोट

लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे ग्रामीण भागातून ग्रामस्थ खरेदीच्या निमित्ताने साताऱ्यात येत असतात. मात्र, ग्रामीण भागातील फेऱ्या अजूनही सुरु झालेल्या नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्या पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे.

- नितीन गारे, एस. टी. प्रवासी.

कोट

सातारा - स्वारगेट आणि सातारा - मुंबई या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून त्या-त्या मार्गावर गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- ज्योती गायकवाड,

विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा

कोट...

अजमेर गरीब नवाझ एक्स्प्रेस, अजमेर फेस्टिवल, गांधीधाम फेस्टिवल एक्सप्रेस, दादर सेंट्रल स्पेशल ट्रेन २५ जूननंतर सुरू होणार आहेत. त्यामुळे समस्या दूर होईल.

- रेल्वे अधिकारी.

जिल्ह्यातील रोजच्या एस. टी. फेऱ्या

३५

सरासरी प्रवासी

७००

धावणाऱ्या रेल्वेंची संख्या

सरासरी प्रवासी

११००

(टेम्प्लेट ७९३)

Web Title: S. T. Other trains run with few passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.