सचिन भोसले यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:39+5:302021-07-26T04:35:39+5:30
कोळकी : व्हीएनएस ग्रुपचे संस्थापक सचिन भोसले यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड प्रदान करून डॉक्टर पदवी बहाल करण्यात ...
कोळकी : व्हीएनएस ग्रुपचे संस्थापक सचिन भोसले यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड प्रदान करून डॉक्टर पदवी बहाल करण्यात आली.
नेल्सन मंडेला जागतिक युनिव्हर्सिटी आहे. विविध क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस या विद्यापीठामार्फत हा पुरस्कार दिला जातो. रिअल इस्टेट या क्षेत्रात कमी वयात सर्वसामान्य कुटुंबातील युवा उद्योजक व्हीएनएस ग्रुपचे संस्थापक सचिन भोसले अत्यंत कमी वयात सर्वसामान्य कुटुंब समोर ठेवून अल्पदरात पाच हजार घरांची उभारणी आहे. याची दखल घेऊन नेल्सन मंडेला अवॉर्ड अकॅडमीचे चेअरमन मधुक्रिष्णन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते कोरीयंथन क्लब व रिसाँल्ट पुणे येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी व पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी ॲड. उज्ज्वल निकम, गायक कुमार सानू, गायिका पलक मोची, हॉकीपट्टू, धनंजय पिल्ले, सुहास मंत्री उपस्थित होते. (वा.प्र.)
फोटो २५कोळकी-एडीव्हीटी
सचिन भोसले यांना डॉक्टरेट पदवी व पुरस्कार प्रल्हाद मोदी व मधुक्रिष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.