डोक्यात टिकाव घालून शेतमजुराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:46 PM2019-05-31T17:46:47+5:302019-05-31T17:47:52+5:30

बांधावर चेंबर काढण्यासाठी खड्डा खोदत असताना झालेल्या वादातून शालीवान जयसिंग पवार (वय ३३, रा. धावडशी, ता. सातारा) यांचा एकाने डोक्यात टिकाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली.

Sackfulness of blood | डोक्यात टिकाव घालून शेतमजुराचा खून

डोक्यात टिकाव घालून शेतमजुराचा खून

Next
ठळक मुद्देडोक्यात टिकाव घालून शेतमजुराचा खूनकारण अस्पष्ट : आरोपीला तत्काळ अटक

सातारा : बांधावर चेंबर काढण्यासाठी खड्डा खोदत असताना झालेल्या वादातून शालीवान जयसिंग पवार (वय ३३, रा. धावडशी, ता. सातारा) यांचा एकाने डोक्यात टिकाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली.

अनिल तुकाराम पवार (मूळ रा. मकनापूर लमाण तांडा, विजापूर कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन पवार (रा. धावडशी, ता. सातारा) याचे शेत कळंबे, ता. सातारा गावच्या हद्दीत आहे. त्याची पाण्याची बारी असल्याने चेंबर काढून त्याला पाईप जोडायची होती. त्यासाठी सचिन याने शालीवान पवार आणि अनिल पवार या दोघांना तेथे कामासाठी नेले होते.

हे दोघे शेताच्या बांधावर खड्डा खोदत होते. त्यावेळी टिकाव अनिल पवारच्या हातात होते. याचवेळी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद क्षणातच विकोपाला गेला आणि अनिलने हातात असलेले टिकाव शालीवान याच्या डोक्यात मारले. तसेच मानेवर आणि पाठीवरही टिकावाचे घाव घातले. सर्व घाव वर्मी लागल्याने शालीवान रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर अनिल पवार तेथून पसार झाला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या सचिनने याची माहिती गावातील लोकांना दिली.

सातारा तालुका पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सचिन पवार आणि इतर लोकांकडून माहिती घेतल्यानंतर अनिल पवार हा फरार झाल्याचे पोलिसांना समजले. मात्र, पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून अनिल पवारला शोधून काढून त्याला काहीतासांतच अटकही केली. त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत असून, हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे चौकीशीअंती स्पष्ट होणार आहे.

Web Title: Sackfulness of blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.