अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडली तिजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:20+5:302021-07-15T04:27:20+5:30

सातारा : राजा शिवछत्रपती परिवाराकडून अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम सुरू असताना मजबूत लोखंडी तिजोरी सापडलेली आहे. या तिजोरीचा उपयोग ...

Safe found on Ajinkyatara fort | अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडली तिजोरी

अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडली तिजोरी

Next

सातारा : राजा शिवछत्रपती परिवाराकडून अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम सुरू असताना मजबूत लोखंडी तिजोरी सापडलेली आहे. या तिजोरीचा उपयोग ब्रिटिशांच्या काळामध्ये काडतुसे व शस्त्रसाठा ठेवण्यासाठी केला जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

या परिवाराकडून जिल्ह्यातील चार ते पाच गडांवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. दिनांक अकरा रोजी परिवारातील जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे व सदस्य किल्ल्यावरील मुख्य राजवाड्यांना स्वच्छता करीत असताना त्यांना एखादा चौथऱ्याचा एक भाग दृष्टिक्षेपात आला. उत्सुकतेपोटी या सदस्यांनी या चौथऱ्याची स्वच्छता सुरू केली असता नजीक असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली लोखंडी पेटीचा काही भाग त्यांना आढळून आला. उत्सुकतेपोटी त्यांनी आणखी साफसफाई केली तर भली मोठी पेटी त्यांना आढळून आली. ही पेटी त्यांनी बाहेर काढली.

ही भक्कम बांधणीची पेटी तीस अंशाच्या कोनात उघड्या अवस्थेत होती आणि पेटीत कौलांचे तुकडे व मातीने भरलेली होती. ही लोखंडी पेटी स्वच्छ केली असताना तिची व्यवस्था वेगळ्या भक्कम बांधणीमुळे या पिढीचे नेमके प्रयोजन लक्षात येत नव्हते. १८१८ मध्ये मराठी मराठी सत्तेचा अस्त झाल्यानंतर किल्ले अजिंक्यताराचा ताबा ब्रिटिशांकडे गेला आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ल्यावर ब्रिटिशांचा ताबा होता. याच कालावधीत किल्ल्याच्या संरक्षणासाठी असलेल्या ब्रिटिश फौजेकडील बंदुकीचे काडतुसे ठेवण्यासाठी भक्कम अशा लोखंडी पेटी या खास आयात केल्या जात असाव्यात. या भेटीची निर्मिती अत्यंत भक्कम अशा लोखंडी किंवा पोलादाच्या पत्र्यापासून केली दिसते कारण दीडशे-दोनशे वर्षानंतर या भेटीचा भक्कमपणा नजरेस येत आहे शिवाय पेटी अंदाजे १०० ते १२५ किलो वजनाची आहे.

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्याला सुमारे ९ शतकांचा इतिहास आहे. परंतु, या गडाला वैभव लाभले ते छ. शिवरायांचे नातू व साताऱ्याचे संस्थापक छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या काळात. याच अजिंक्यताऱ्यावर राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत एक लोखंडी तिजोरी आढळली आहे. जाणकारांच्या मते ही तिजोरी ब्रिटिशकालीन आर्म बॉक्स म्हणजे बंदुकांची काडतुसे ठेवण्यासाठी असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अशाच दोन लोखंडी तिजोरी चौथऱ्यानजीकच्या ढिगाऱ्यात असून, लवकरच त्या पेट्या बाहेर काढण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी संग्रहालयाकडून पत्रव्यवहार...

अजिंक्यतारा येथील चौथऱ्यानजीक ढिगाऱ्यात एक ब्रिटिशकालीन तिजोरी आहे. अजून एक तिजोरी असून, त्या ठिकाणी आणखी काही ब्रिटिशकालीन वस्तू आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई येथील संग्रहालय संचालकाकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याबाबत परवानगी आल्यास त्या परिसरात खोदकाम करून इतिहासकालीन साहित्य काढण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

फोटो आहे

Web Title: Safe found on Ajinkyatara fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.