गुन्हे होऊच नयेत यासाठीच ‘अॅक्शन प्लॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:36 PM2020-01-25T23:36:37+5:302020-01-25T23:37:06+5:30
गावागावत सीसीटीव्ही, ग्रामपंचायतींवर भोंगा आणि ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावांच्या सुरक्षेची घेतलेली काळजी चोरांच्या मनातही धडकी भरवतेय. - अजय गोरड, सहायक पोलीस निरीक्षक, उंब्रज
दीपक शिंदे।
सातारा : गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पण चोºया होऊच नयेत, यासाठी काही अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग राबविले आणि त्यामध्ये त्यांना यशही आल्याचे उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले.
प्रश्न : वाढत्या चो-या रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या?
उत्तर : चोरी करणाºया व्यक्तीला आपल्याला कोणी पाहिलं ही भीती असते. त्याच्या या कमजोरीचाच आम्ही शस्त्र म्हणून वापर केला. या चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर केला. प्रत्येक गावामध्ये सीसीटीव्ही लावला जावा, असा आग्रह धरला. त्यामुळे चोरट्यांवर पहिल्यांदा सीसीटीव्हीचा आणि नंतर पोलिसांचा वचक बसला. आपल्याला कोणी पाहत नाही, असा त्याचा भ्रम निघून गेला आणि चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले.
प्रश्न : गाव पातळीवर गावकºयांचे सहकार्य कसे मिळते?
उत्तर : गावातील लोक उत्स्फूर्तपणे पोलिसांच्या मदतीला येतात. अशा लोकांची ग्राम सुरक्षा पथकामध्ये नेमणूक केली. त्यामध्ये तरुण, मध्यमवयीन ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांचा समावेश केला. त्यामुळे प्रत्येक घटना पोलिसांना कळू लागली. यामुळेही चोºया आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.
प्रश्न : यात्राकाळात काय खबरदारी घेण्यात आली ?
उत्तर : पालीची खंडोबा आणि उंब्रजची सीतामाई या दोन मोठ्या यात्रा होतात. याठिकाणी चोºयांचे प्रमाण टाळण्यासाठी मोठ्या स्पीकरवरून लोकांना माहिती दिली. सर्वजण सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेºयाच्या नजरेत असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे लोकांमध्ये वचक निर्माण होऊन यात्रांमधील चोºयांचे प्रमाण घटले.
- गुन्हेगारांची कुंडली मांडण्याचा उपक्रम
उंब्रज परिसरात असलेल्या छोट्या-मोठ्या सर्वच गुन्हेगारांची कुंडलीच पोलीस स्टेशनमध्ये मांडण्यात आली आहे. असा गुन्हेगार जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये पुन्हा अटक होईल तेव्हा त्याने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची कुंडलीच त्याच्यासमोर मांडली जाते. त्याने केलेले चुकीचे काम आणि त्यामध्ये होत नसलेली सुधारणा यामुळे त्याला जास्तीत जास्त शासन होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे वचकही बसतो.
- गावक-यांच्या सुरक्षितेसाठी भोंगा
ग्रामसुरक्षा दलाच्या नजरेत एखाद्या चुकीचा प्रकार किंवा चोरीची घटना घडणार असल्याचे दिसले तर पोलीस पाटलांनी ग्रामपंचायतीवर बसविण्यात आलेला भोंगा वाजवायचा. यामुळे गावातील लोक जागे होतात आणि चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटेही आपला उद्देश साध्य होणार नाही, असे समजून निघून जातात. या भोंग्याला पोलीस सायरनचा आवाज देण्यात आला आहे.