‘सह्याद्री’, अजिंक्यतारा कारखान्यास देशपातळीवरील पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:16+5:302021-02-05T09:05:16+5:30
मसूर : देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणाऱ्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज्, नवी दिल्ली या संस्थेकडून जास्तीत जास्त ...
मसूर : देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणाऱ्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज्, नवी दिल्ली या संस्थेकडून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील दि्वतीय क्रमांकाचा पुरस्कार सह्याद्री आणि अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.
देशाला परकीय चलन उपलब्ध होऊन, अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात करण्याबाबत जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ५ लाख ८० हजार ७३० क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात केलेली आहे. ही साखर निर्यात २०१९ - २० च्या साखर उत्पादनाच्या ४२ टक्के आहे. त्याबद्दल नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज्, नवी दिल्ली या संस्थेने कारखान्यास हा पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराचे वितरण मार्च, २०२१ मध्ये ‘साखर उद्योगासमोरील जागतिक आव्हाने व भारतातील साखर उद्योगाच्या नावीन्यपूर्ण वाढीस दृष्टिकोन’ या विषयावरील परिषदेत समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.
कारखान्यास हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो आहे...