सह्याद्रीचे वृक्षसंवर्धन आदर्शवत : बाळासाहेब पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:26+5:302021-07-03T04:24:26+5:30
मसूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आजवर वृक्षारोपण करून त्याची चांगल्या पद्धतीने जोपासना केली आहे. त्यामुळे कारखाना परिसर पर्यावरणपूरक ...
मसूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आजवर वृक्षारोपण करून त्याची चांगल्या पद्धतीने जोपासना केली आहे. त्यामुळे कारखाना परिसर पर्यावरणपूरक होऊन, पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत झाली आहे. या वृक्षारोपणाची व वृक्षसंवर्धनाची दखल राज्य शासनाने घेऊन, राज्य पातळीवरील वनश्री पुरस्कार कारखान्यास यापूर्वीच प्राप्त झालेला आहे. सह्याद्रीचे वृक्षसंवर्धन आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.
पी. डी. पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनाचे औचित्य साधून, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायत यशवंतनगर व वन विभागाच्या वतीने कारखानानजीकच्या महादेव डोंगर उतारावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कारखान्याचे संस्थापक पी. डी. पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सह्याद्री कारखाना कार्यस्थळावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, महादेव मोहिते, तहसीलदार अमरदीप वाकडे, माजी उपायुक्त तानाजीराव साळुंखे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, महावितरणचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कऱ्हाड उत्तरचे जसराज पाटील, संचालक अविनाश माने, सचिन बेलागडे, रणजित पाटील, सतीश मोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०२मसूर
फोटो ओळ : सह्याद्री साखर कारखाना येथे वृक्षारोपणप्रसंगी मंत्री बाळासाहेब पाटील, सुनील माने, जसराज पाटील, अविनाश माने, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.