साताऱ्याच्या सैनिक स्कूलला ऊर्जितावस्था येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:39 AM2021-03-10T04:39:03+5:302021-03-10T04:39:03+5:30

कऱ्हाड : ‘सातारा सैनिक स्कूलच्या प्रश्नाबाबत लोकसभेसह राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा येथे नवीन शासकीय ...

Sainik School in Satara will be energized | साताऱ्याच्या सैनिक स्कूलला ऊर्जितावस्था येणार

साताऱ्याच्या सैनिक स्कूलला ऊर्जितावस्था येणार

googlenewsNext

कऱ्हाड : ‘सातारा सैनिक स्कूलच्या प्रश्नाबाबत लोकसभेसह राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या मान्यतेसह सातारा सैनिक स्कूलसाठी तीनशे कोटींच्या भरीव निधीची तरतूद केल्याचा आनंद आहे. त्यामुळे सैनिकी शाळेला ऊर्जितावस्था येणार आहे,’ अशी प्रतिक्रिया खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी १९६१ मध्ये साताऱ्याच्या सैनिक अधिकारी घडविणाऱ्या शाळेची पायाभरणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावातील मुले सैन्यात अधिकारी झाली. यामध्ये सध्या ६२० कॅडेट्स शिक्षण घेत आहेत. ही शाळा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी दिलेल्या अनुदानावर चालते. राज्य सरकारबरोबर ३० डिसेंबर २०१६च्या करारान्वये सैनिक स्कूलच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, सैनिक स्कूलची देखभाल याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून अनुदान मिळाले नसल्याचे निवेदन शाळेच्या व्यवस्थापनाने दिले होते.

सदरची शाळा चालवण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही. याठिकाणी चाळीस वर्षांपासून सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न आहे. त्यांना पेन्शन व अन्य सोयीसुविधा मिळत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठीही निधी उपलब्ध होत नाही. याबाबत नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर मुद्दा उपस्थित करून आवाज उठवला होता. शाळेच्या होत चाललेल्या दुरवस्थेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारकडे यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रामुख्याने केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सातारा सैनिकी शाळेला तीन वर्षात तीनशे कोटींचा निधी देण्याचेही जाहीर केले आहे. यापैकी २०२१-२२ या कालावधीत शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सैनिक स्कूलला ऊर्जितावस्था तर येईलच शिवाय विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे. साताराच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सैनिक स्कूलसंदर्भात वेळोवेळी केलेल्या पाठपुरव्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याने आनंद वाटत आहे.

फोटो 8श्रीनिवास पाटील 02

Web Title: Sainik School in Satara will be energized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.