संजयनगरच्या विकासासाठी उदयनराजेंना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:48+5:302021-01-25T04:39:48+5:30

दरम्यान, संजयनगर ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा सत्कार करीत खासदार उदयनराजे भोसले यांनी नवीन स्थापन झालेल्या या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, ...

Sakade to Udayan Raje for the development of Sanjaynagar | संजयनगरच्या विकासासाठी उदयनराजेंना साकडे

संजयनगरच्या विकासासाठी उदयनराजेंना साकडे

googlenewsNext

दरम्यान, संजयनगर ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा सत्कार करीत खासदार उदयनराजे भोसले यांनी नवीन स्थापन झालेल्या या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली.

कऱ्हाड तालुक्यातील संजयनगर-शेरे या ग्रामपंचायतीची नव्याने स्थापना झाली असून, पहिलीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा ग्रामस्थांनी पाडला. स्थापनेनंतरचे पहिले सदस्य होण्याची इच्छा अनेकांची होती. त्यासाठी चुरसही लागली होती. मात्र, ग्रामस्थांनी समजूतदारपणा दाखवत अर्ज माघारी घेऊन बिनविरोधला हातभार लावला. सध्या गावासमोर अनेक समस्या आहेत. स्वच्छ व पुरेशा पाण्याची उपलब्धता, रेल्वे लाईन पुलाखालील सांडपाण्याचे व्यवस्थापन, प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय, सामूहिक घरकुल योजना प्रकल्प, रेल्वे हद्दीमुळे बाधित होणाऱ्या घरांचा निवाडा, दुहेरी भुयारी मार्ग व पाणी निचरा व्यवस्थापन या समस्या सोडविण्याचे आव्हान आहे. या समस्यांचा पाढा नव्या सदस्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडला. समस्यांचे निवेदन देऊन विविध विकासकामांची मागणी केली.

यावेळी मोहनराव निकम, डी. आर. चव्हाण, राहुल पाटील, मोहनराव साळुंखे, अशोक मस्के, सुनील शिंगाडे, अशोक आडके, सर्जेराव मदने, सतीश चव्हाण, दीपक जाधव, बंडा पवार, रघुनाथ मदने, रणजित बाबर, संतोष सातपुते व ग्रामस्थ उपस्थित होते. खासदार भोसले यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.

फोटो : २४केआरडी०३

कॅप्शन : संजयनगर-शेरे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांनी सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांना निधीसाठी साकडे घालून निवेदन सादर केले.

Web Title: Sakade to Udayan Raje for the development of Sanjaynagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.