जमिनीच्या वादातून मुलाकडून सख्ख्या बापाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:24+5:302021-08-01T04:36:24+5:30

फलटण : निरगुडी (ता. फलटण) येथे भावाच्या नावावर जमीन केली म्हणून सख्खा बापाला मुलाने लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना ...

Sakhya father beaten by son over land dispute | जमिनीच्या वादातून मुलाकडून सख्ख्या बापाला मारहाण

जमिनीच्या वादातून मुलाकडून सख्ख्या बापाला मारहाण

Next

फलटण : निरगुडी (ता. फलटण) येथे भावाच्या नावावर जमीन केली म्हणून सख्खा बापाला मुलाने लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, संपत व्यंबक सस्ते (वय ७८, रा. निरगुडी, ता. फलटण) यांना संदीप संपत सस्ते आणि शुभम संदीप सस्ते (दोघे रा. निरगुडी ता. फलटण) यांंनी ‘तुम्ही भाऊ रणजित संपत सस्ते यांच्या नावावर आई रजनी हिच्या नावावर असलेली जमीन का केली?,’ असे म्हणून अंगणात पडलेल्या लोखंडी पाईपाने उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून दमदाटी केली. रणजित सस्ते व रजनी सस्ते यांनासुद्धा भांडण सोडविण्यास आले असता नातू शुभम सस्ते याने त्यांच्या दोन्ही पायाच्या पोटरीवर व मांड्यावर हातातील पाईपने मारहाण केली व पत्नी रजनी हिला संदीप याने जमिनीवर खाली ढकलून दिल्याची फिर्याद संपत सस्ते यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहे.

Web Title: Sakhya father beaten by son over land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.