काळोशी येथे सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:27+5:302021-06-09T04:48:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तालुक्यातील काळोशी येथील एका शेतकऱ्याच्या सख्ख्या भावाने आंब्यावर बैल नाचवून नुकसान केले, तसेच याची ...

Sakhya's brother attacked with an ax at Kaloshi | काळोशी येथे सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला

काळोशी येथे सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तालुक्यातील काळोशी येथील एका शेतकऱ्याच्या सख्ख्या भावाने आंब्यावर बैल नाचवून नुकसान केले, तसेच याची विचारणा केली म्हणून शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात बाळकृष्ण जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सत्यवान हणमंत जाधव (वय ४७, रा. कोडोली, ता. सातारा) हे शेतकरी दि. २३ मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे काळोशी येथील चुलते बन्याबा जाधव यांच्या शेतातील झाडावरील आंबे काढत होते. या वेळी सत्यवान यांचा भाऊ बाळकृष्ण हणमंत जाधव (वय ४३, रा. काळोशी, पो. कोडोली, ता. सातारा) हा तेथे दारू पिऊन आला. या वेळी त्याने झाडावरून खाली उतरून ठेवलेल्या आंब्यावर बैल नाचवला आणि आंब्यावर थुंकला. यात आंबे खराब झाले आणि नुकसानही झाले. या वेळी त्याने शिवीगाळही केली. दरम्यान, याची विचारणा झाल्याने बाळकृष्ण याने चिडून जाऊन सत्यवान यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात सत्यवान यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला जखम झाली आहे. या घटनेनंतर त्यांनी दि. ७ जून रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी बाळकृष्ण याच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.

Web Title: Sakhya's brother attacked with an ax at Kaloshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.