साक्षी, श्रीकांत एज्युकेशन आयडॉल
By admin | Published: October 8, 2014 09:54 PM2014-10-08T21:54:12+5:302014-10-09T00:47:15+5:30
हिवरे, वाघमोडे प्रथम
सातारा : ‘लोकमत बालविकास मंच आणि चाटे स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सातारा ज्युनिअर एज्युकेशन आयडॉल २०१४’ या सामान्य ज्ञान स्पर्धेत सातारा विभागात लहान गटामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थी साक्षी संभाजी कापरे आणि मोठ्या गटात श्री मुधाईदेवी हायस्कूल देऊरचा विद्यार्थी श्रीकांत प्रकाश कदम यांनी प्रथम क्रमांक पटकविला. यशस्वी विद्यार्थ्यांना चाटे क्लासेसचे व्यवस्थापक राजेंद्र गुले, एल. एन. खंडागळे, सत्यजित पाध्ये यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘लोकमत बालविकास मंच’ तर्फे रविवार, दि. ४ आॅक्टोबर रोजी चाटे स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा दोन गटांत पार पडली. स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सातारा आणि कऱ्हाड या दोन्ही विभागांत ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या सातारा येथील विजेत्यांना चाटे स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने राजेंद्र गुले, एल. एन. खंडागळे, सत्यजित पाध्
ये यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये साक्षी, श्रीकांत, ऋतुजा, प्रथमेश हे सातारा ज्युनिअर एज्युकेशन आयडॉल २०१४ ठरले. (प्रतिनिधी)
हिवरे, वाघमोडे प्रथम
कऱ्हाड येथील स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी प्रथमेश मंगेश हिवरे आणि मोठ्या गटात लाहोटी कन्याशाळेची विद्यार्थिनी ऋतुजा किसन वाघमोडे यांनी प्रथम क्रमांक पटकविला. कऱ्हाड येथील विजेत्यांना लवकरच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ९७६२५२७१०९