खोट्या सह्या करून पाक्षिक मासिकाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:46 AM2021-03-01T04:46:45+5:302021-03-01T04:46:45+5:30

सातारा: पाक्षिक मासिकाचे लायसन्स मिळविण्यासाठी एकाचा फोटो आणि खोट्या सह्या करून त्याची विक्री केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांवर शाहूपुरी पोलीस ...

Sale of fortnightly magazines with false signatures | खोट्या सह्या करून पाक्षिक मासिकाची विक्री

खोट्या सह्या करून पाक्षिक मासिकाची विक्री

Next

सातारा: पाक्षिक मासिकाचे लायसन्स मिळविण्यासाठी एकाचा फोटो आणि खोट्या सह्या करून त्याची विक्री केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संजीव कुमार कोटेचा (रा. जयप्पानगर, इचलकरंजी), बाळासोा मडगुंडा पाटील (मु. पो. चंदर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयकुमार महादेव बेंद्रे (वय ३९, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांच्याकडे असणाऱ्या पाक्षिक मासिकाचे लायसन्स मिळावे, म्हणून संजीव कुमार कोटेचा आणि बाळासाहेब पाटील यांचे नोव्हेंबर २०२० पासून प्रयत्न सुरू होते. मात्र, या दोघांनी जयकुमार बेंद्रे यांचे फोटो व खोट्या सह्या घेऊन स्वत:च्या फायद्याकरिता संगनमत करून मासिकाची विक्री केली. ही बाब लक्षात आल्यानंतर जयकुमार बेंद्रे यांनी शनिवार, दि. २७ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक फौजदार भिसे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Sale of fortnightly magazines with false signatures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.