रेशनचे धान्य विक्रीला; ३ रुपये किलोने खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:44 AM2021-09-15T04:44:53+5:302021-09-15T04:44:53+5:30
सातारा : गोरगरिबांची कुटुंबे उपाशी राहू नयेत, या उदात्त हेतूने राज्य व केंद्र शासनाने कठीण काळामध्ये गोरगरिबांना मोफत धान्य ...
सातारा : गोरगरिबांची कुटुंबे उपाशी राहू नयेत, या उदात्त हेतूने राज्य व केंद्र शासनाने कठीण काळामध्ये गोरगरिबांना मोफत धान्य देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून पैसे खर्च केले. परंतु जे लाभार्थी हे धान्य घेऊन जातात त्यापैकी अनेक जण परस्पर हे धान्य विक्री करत आहेत.
स्वस्त धान्य दुकानातील धान्य अनेक लाभार्थ्यांकडून विक्री केले जात असून, ते खरेदी करणारीदेखील टोळी सर्व जिल्ह्यात कार्यरत आहे. तांदूळ, गहू या धान्यांचा बाजारातील भाव जास्त आहे. अनेकजण अशा लाभार्थींना गाठून त्यांच्याकडून स्वस्त दरात ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी विकत घेतात. हेच धान्य पुन्हा चढ्या भावाने बाजारात विक्री केले जाते. अशी टोळी कार्यरत आहे. या टोळीवर यंत्रणेने वचक ठेवणे गरजेचे आहे.
रियालिटी चेक
१) हे घ्या पुरावे
वाई : तालुक्यात काही लोक त्याचे लाभधारक आहेत. कोणाच्या काळात राज्य शासन तसेच शासनाने मोफत धान्य वाटप केले. हे धान्य अनेक लाभार्थ्यांना दुसरीकडे जाऊन विकले.
सातारा : परिसरात मोठ्या संख्येने रेशनिंग लाभार्थी आहेत. लोकसंख्याही मोठी आहे. रेशनिंगमध्ये मिळणारे गहू, तांदूळ घेतले ते इतर लोकांना पैसे घेऊन विकले.
कऱ्हाड : या परिसरात एक किरकोळ व्यापारी येतो. लोकांच्याकडे जमा झालेले धान्य गोळा करून तो त्यांना पैसे देऊन धान्य घेऊन जातो. नंतर बाजाराच्यादिवशी गुरुवार, रविवारी बाजारात बसून तो धान्य विक्रीतून फायदा कमवतो.
२) चार रुपये किलो तांदूळ
लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळालेले असते. त्यामुळे त्यांना त्याची विशेष किंमत राहत नाही. धान्याचे पैसे झाल्यास बरे म्हणून पडेल त्या भावाने या धान्याची विक्री केली जाते. बाजारात २० रुपये किलोखाली तांदूळ नाही. मात्र, अवघ्या चार रुपये किलोने तांदूळ लाभार्थीकडून घेतला जातो.
३) जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा कोट
रेशनिंगचे धान्य खासगी लोकांना विक्री करण्याचा प्रकार अजूनतरी समोर आलेला नाही. मात्र, रेशनिंगच्या धान्याची गरज गोरगरिबांना आहे. ज्यांना गरज नसेल, त्यांनी अशाप्रकारे धान्य विक्री केल्यास त्यांची शिधापत्रिका रद्द केली जाईल.
स्नेहा किसवे देवकाते,
जिल्हा पुरवठा अधिकारी