ज्योती मांढरेच्या मागे आता सलमा शेख प्रकरण

By admin | Published: August 26, 2016 10:33 PM2016-08-26T22:33:23+5:302016-08-26T23:17:45+5:30

सात दिवस पोलिस कोठडी : ज्योतीच्या मोबाईलचाही लागेना सुगावा

Salma Shaikh case behind Jyoti idling | ज्योती मांढरेच्या मागे आता सलमा शेख प्रकरण

ज्योती मांढरेच्या मागे आता सलमा शेख प्रकरण

Next

वाई : मंगल जेधे खून प्रकरणात अटकेत असलेल्या ज्योती मांढरेच्या मागे आता सलमा शेख खून प्रकरण लागले आहे. ज्योती मांढरेचा मोबाईल सापडत नाही तसेच तिला सलमा शेख खुनाचा तपास करण्यासाठी शुक्रवारी वाई न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यात तिला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याची मुदत १ सप्टेंबरला संपत आहे, तर संतोष पोळला न्यायालयीन कोठडी सुनावली.
मंगल जेधे खून प्रकरणातील ज्योतीच्या पोलिस कोठडीची
मुदत संपल्याने गुरुवारी
तिला न्यायालयीन कोठडी दिली होती. पोलिसांनी पुन्हा तिला सातारा येथील कारागृहात वर्ग
करून तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी
तिला शुक्रवारी न्यायालयासमोर
उभे करून सलमा शेख खून प्रकरणात सात दिवसांची
पोलिस कोठडी मिळविली आहे. (प्रतिनिधी)

भारती कोरवार यांनी घेतलं संतोषचं वकीलपत्र
संतोष पोळ आणि ज्योती मांढरे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी, त्यामुळे कोणीतरी त्यांचे वकीलपत्र घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, वकील संघटनेने संतोष पोळ व ज्योती मांढरे यांचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा युक्तिवाद तो न्यायालयात करू शकतो म्हणून त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून अ‍ॅड. भारती कोरवार यांनी शुक्रवारी न्यायालयात वकीलपत्र दाखल केले. अ‍ॅड. भारती कोरवार या संतोष पोळची बाजू मांडणार आहेत. त्या विधी सेवा समितीच्या सदस्या आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून भारती कोरवार संतोषची बाजू मांडणार आहेत.
संतोषला आज न्यायालयात हजर करणार
संतोष पोळलाही साताऱ्यातील कारागृहात वर्ग करून त्याला पुन्हा सलमा शेख खून प्रकरणात शनिवारी न्यायालयासमोर हजार करण्यात येणार आहे. त्याचीही पोलिस कोठडी मिळविण्यासाठी पोलिस प्रयत्न करणार आहेत.

Web Title: Salma Shaikh case behind Jyoti idling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.