समितीत सामसूम; गावांत धामधूम

By admin | Published: July 31, 2015 09:25 PM2015-07-31T21:25:24+5:302015-07-31T21:25:24+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : सभापतीसह सदस्यांच्या गावांत अटीतटीची लढत

Samatam Samasoom; Hailstorm | समितीत सामसूम; गावांत धामधूम

समितीत सामसूम; गावांत धामधूम

Next

अरुण पवार - पाटण  -तालुक्याची विधानसभा समजल्या जाणाऱ्या पाटण पंचायत समितीच्या आवारात गेल्या आठवड्यापासून सामसूम पसरली आहे. सभापती, उपसभापतींचे कक्ष रिकामे दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा परिणाम व आचारसंहितेचा बडगा लागू झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, सभपातींसह इतर सदस्यांच्या गावातच अटीतटीची निवडणूक असल्याने आपले राजकीय वजन दाखविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गावात चांगलीच त्रेधातिरपीट उडताना दिसून येत आहे.पंचायत राजव्यवस्थेत ग्रामपंचायत हा महत्त्वाचा कणा समजला जातो. म्हणूनच पाटण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू असल्यामुळे पंचायत समितीकडे कोणी फिरकताना दिसून येत नाही. त्यातच सभापतींसह इतर सदस्यांच्या गावात देसाई-पाटणकर गटांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी काँटे की टक्कर सुरू आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात आवले नाव असल्यामुळे स्वत:च्या गावातच पराभव नशिबी येऊ नये म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पाटण पंचायत समितीत आमदार शंभूराज देसाई आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे प्रत्येकी आठ-आठ सदस्य आहेत. सभापती संगीता गुरव या पाटणकर गटाच्या समर्थक आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सभापती, उपसभपाती पंचायत समितीत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना काहीच काम उरले नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या आवारात सध्यातरी सामसूम दिसून येत आहे.


पंचायत समिती हा ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा दुवा आहे. ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पंचायत समितीतून केले जाते. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे लागते. त्यामुळे पाटण पंचायत समितीत पदाधिकारी व जनतेचा वावर कमी झालेला आहे.
- अरविंद पाटील, गटविकास अधिकारी

Web Title: Samatam Samasoom; Hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.