काले येथील संभाजी यादव यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:00+5:302021-09-25T04:42:00+5:30
कऱ्हाड : काले, ता. कऱ्हाड येथील शिवाजीनगर प्राथमिक शाळेतील शिक्षक संभाजी यादव यांचा पंचायत समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने ...
कऱ्हाड : काले, ता. कऱ्हाड येथील शिवाजीनगर प्राथमिक शाळेतील शिक्षक संभाजी यादव यांचा पंचायत समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने के.एन. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरेश तेली, माणिक यादव, जालिंदर पोतदार उपस्थित होते. संस्कारक्षम विद्यार्थी घडवत असताना शिक्षकाची आदर्श मूल्ये मुलांच्या मनावर कोरली जातात. त्यातून विद्यार्थ्यांचा शिक्षकही आदर्श बनत जातो. असे शिक्षक समाजासाठी आदर्श ठरतात, असे गौरवोद्गार के.एन. देसाई यांनी काढले. सचिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. उज्ज्वला यादव यांनी आभार मानले.
मानसी पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या मानसी पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आविष्कार फाउंडेशनच्या वतीने ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त, उद्योजक शेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उपप्राचार्य प्रा. पाटील, प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. एस.बी. कांबळे, वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एम.बी. किशोर यांच्यासह प्राध्यापकांनी त्यांचा सत्कार केला.
योगी जगन्नाथ बाबाजी यांची पुण्यतिथी साजरी
कऱ्हाड : शेरे, ता. कऱ्हाड येथील गोरक्षनाथ मठात योगी जगन्नाथ बाबाजी यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त सकाळी अभिषेक तसेच पूजा पार पडली. त्यानंतर भजन आणि फुले टाकण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हालगा-बेळगाव येथील गोपालनाथ बाबाजी उपस्थित होते. आरतीनंतर गोपालनाथ बाबाजी यांचा दर्शन सोहळा झाला. योगी फुलनाथजी यांनी स्वागत केले. या सोहळ्यास सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील भक्त उपस्थित होते. गोरक्षनाथ मठ भक्त मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
एसजीएम कॉलेजमध्ये व्याख्यानास प्रतिसाद
कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य प्रा. एस. के. पाटील, प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. कांबळे, आर. वाय. पाटील, पर्यवेक्षक नांगरे, तानाजी पाटील, किशोर जाधव, संदीप जाधव, संतोष पवार, शेखर खटावकर उपस्थित होते. तानाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्रुती शिंदे, किरण पवार, राधाराणी लक्ष्मीराम, जागृती देशमुख, सुकन्या यादव, उपप्राचार्य प्रा. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.