१०८ दिव्यांगांची सम्मेद शिखरजी यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:37 AM2021-03-19T04:37:34+5:302021-03-19T04:37:34+5:30
फलटण : सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून नगरसेवक अनुप शहा यांनी १०८ दिव्यांगांना सम्मेद शिखरजी यात्रा घडविली असून, जवळपास ...
फलटण : सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून नगरसेवक अनुप शहा यांनी १०८ दिव्यांगांना सम्मेद शिखरजी यात्रा घडविली असून, जवळपास ४०० लोकांनी ही यात्रा यावर्षी पूर्ण केली आहे.
यावर्षी या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, कर्नाटक राज्यांतील १०८ दिव्यांगांना या उपक्रमात सामील करून घेऊन त्यांना सम्मेद शिखर यात्रा घडविण्याचे काम अनुप शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. ही अत्यंत प्रेरणादायी आणि भगवान महावीरांचा संदेश तंतोतंत अंगीकारल्याची घटना मानावी लागेल. एकूण ४०० लोकांच्या या यात्रेत १०८ दिव्यांगांचा समावेश होता. त्यामध्ये राजस्थानमधील ७, गुजरातमधील ५, कर्नाटकमधील १२ आणि महाराष्ट्रातील ८६ भाविकांचा समावेश होता.
या १०८ दिव्यांगांमध्ये १२ जण १०० टक्के अंध होते. या सर्वांना फलटण ते सम्मेद शिखर यात्रा करविताना स्वतः अनुप शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत निश्चित प्रेरणादायी आहे, तथापि त्यापेक्षा ज्या दिव्यांगांना आपले दैनंदिन जीवन व्यतीत करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, ही मंडळी एवढ्या दूर अंतरावरील आणि विशेषतः पहाडावरील तीर्थक्षेत्री जाऊन भगवंताचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात. ही भावनाच प्रेरणादायी आहे.
ज्यांना सरळ रस्त्याने उभे राहून चालता येत नाही, ती मंडळी डोंगरावरील तीर्थक्षेत्री शेकडो पायऱ्या चढून जाताना कसलाही, कोणाचाही आधार न घेता सर्व पायऱ्या स्वतः चढून जातात.
१८फलटण
सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून नगरसेवक अनुप शहा यांनी १०८ दिव्यांगांना सम्मेद शिखरजी यात्रा घडविली. या यात्रेत सुमारे ४०० जणांचा सहभाग होता. (छाया : नसीर शिकलगार)