कार्वेच्या सरपंचपदी संदीप भांबुरे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:53 AM2021-02-26T04:53:51+5:302021-02-26T04:53:51+5:30
कार्वे ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दुरंगी लढत झाली. भाजपप्रणित सिद्धेश्वर पॅनेल तर महाआघाडीचे धानाईदेवी ...
कार्वे ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दुरंगी लढत झाली. भाजपप्रणित सिद्धेश्वर पॅनेल तर महाआघाडीचे धानाईदेवी यशवंत विकास पॅनेलमध्ये समोरासमोर लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या सिद्धेश्वर पॅनेलने दहा जागांवर विजय मिळविला. तर महाआघाडीच्या धानाईदेवी यशवंत पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले. निवडणुकीनंतर सरपंच, उपसरपंच निवडीचे सर्वांना वेध लागले होते. दोन दिवसांपूर्वी ही निवड बिनविरोध पार पडली. अर्ज भरण्याच्या मुदतीत सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे डी. एस. पोतदार, सी. वाय पवार यांनी जाहीर केले.
सरपंचपदी संदीप भांबुरे तर उपसरपंचपदी प्रवीण पाटील ऊर्फ पी. के. यांची निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
फोटो : २५संदीप भांबुरे
फोटो : २५प्रवीण पाटील