फलटणमधील वाळूमाफिया एक वर्षासाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:41 AM2019-09-28T11:41:31+5:302019-09-28T11:46:24+5:30

फलटण शहर हद्दीत सरकारी कामात अडथळा करून सरकारी नोकरास मारहाण करून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तीन वाळूमाफियांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

Sandfly in Phaltan deported for one year | फलटणमधील वाळूमाफिया एक वर्षासाठी हद्दपार

फलटणमधील वाळूमाफिया एक वर्षासाठी हद्दपार

googlenewsNext
ठळक मुद्देफलटणमधील वाळूमाफिया एक वर्षासाठी हद्दपारसातारा, बारामती, पुरंदर, माळशिरस तालुक्यातून हद्दपार

सातारा : फलटण शहर हद्दीत सरकारी कामात अडथळा करून सरकारी नोकरास मारहाण करून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तीन वाळूमाफियांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

टोळी प्रमुख नीलेश महादेव तेलखडे (वय ३३), गणेश महादेवराव तेलखडे (वय ३६, दोघे रा. मलटण, ता. फलटण), उमेश सुदाम यमपुरे (वय ३२, रा. भाडळी खुर्द, ता. फलटण) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर बेकायदा वाळू वाहतूक व बेकायदा वाळू उपसा करून सरकारी नोकरांना मारहाण करण्याबाबतचे गंभीर गुन्हे फलटण पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

त्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे या तिघांना सातारा जिल्हा तसेच बारामती, पुरंदर, माळशिरस तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
 

Web Title: Sandfly in Phaltan deported for one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.