माणगंगा नदीपात्रात वाळूचोरीचा धडाका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:40 AM2021-05-11T04:40:59+5:302021-05-11T04:40:59+5:30

म्हसवड : माण तालुक्यातील माणगंगा नदीपात्रातून वाळू चोरीचा धडाका सुरूच आहे. मात्र, तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी वाळूमाफियांवर कारवायाचा ...

Sandstorm continues in Manganga river basin | माणगंगा नदीपात्रात वाळूचोरीचा धडाका सुरूच

माणगंगा नदीपात्रात वाळूचोरीचा धडाका सुरूच

Next

म्हसवड : माण तालुक्यातील माणगंगा नदीपात्रातून वाळू चोरीचा धडाका सुरूच आहे. मात्र, तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी वाळूमाफियांवर कारवायाचा बडगा उगारल्याने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. देवापूर येथील माणगंगा नदीपात्रातून वाळूची चोरी करणाऱ्या टेम्पोवर महसूल विभागाने कारवाई करीत वाळू भरलेला टेम्पो व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.

याबाबत माहिती अशी की, हिंगणीच्या कोतवालांना अवैध वाळू तस्करीची माहिती फोनवरून मिळताच पोलीस पाटील व कोतवाल यांनी हिंगणीकडे जाणाऱ्या टेम्पोला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन पळून जाण्याच्या इराद्याने देवापूरकडे निघाले. याची संपूर्ण माहिती माणच्या तहसीलदारांना देताच त्यांच्या आदेशानुसार सर्कल ऑफिसर उमरसिंह परदेशी व देवापूरचे तलाठी आनंदा सूर्यवंशी यांनी कालापट्टा देवापूर याठिकाणी जाऊन सदर वाहन ताब्यात घेतले. ही कारवाई करीत असताना नदीपलीकडे कोतवाल व पोलीस पाटील यांनी दोन दुचाकी नदी पलीकडे लावल्या होत्या. कारवाईनंतर परत जाताना त्यांना दोन्हीही गाडीची मोडतोड केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विशाल पोपट माने (रा. हिंगणी), दाजी शरद

येडगे (दोघे रा. हिंगणी) व अनोळखी एका विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

कारवाईत उमरसिंह परदेशी व देवापूरचे तलाठी आनंदा सूर्यवंशी, हिंगणीचे पोलीस पाटील व कोतवाल यांनी सहभाग घेतला.

चौकट : १०म्हसवड-सॅण्ड०१

कोतवाल व पोलीस पाटलांच्या गाड्यांची मोडतोड

टेम्पोवर कारवाई करून माघारी निघालेल्या कोतवाल व पोलीस पाटलांच्या दोन्ही मोटर सायकलचे अज्ञाताने नुकसान केले आहे. निर्ढावलेल्या वाळूतस्करांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी जनतेतून होत आहे. माणमध्ये यापूर्वीही जिवे मारण्यापर्यंत हल्ले झाले आहेत. कोरोनाशी सामना करावा लागत असताना तहसीलदार व त्यांच्या पथकाने अवैध तस्करीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला.

वाळूतस्करांनी महसूलमधील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून म्हसवड, शिरताव, देवापूर याठिकाणी नदीपात्र पोखरण्यास सुरुवात केली.

१०म्हसवड-सॅण्ड

माण तालुक्यातील देवापूर येथे याच टेम्पोतून वाळू वाहतूक केली जात होती. (छाया : सचिन मंगरुळे).

Web Title: Sandstorm continues in Manganga river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.