शिक्षण विभागाच्या वक्तृत्व स्पर्धेत सानिका बाबर प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:38 AM2021-04-11T04:38:06+5:302021-04-11T04:38:06+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांर्तगत ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांर्तगत ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजची इयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी सानिका संभाजी बाबर हिने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. तसेच तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिवा शुभांगी गावडे, मुख्याध्यापक ए.जे. कुंभार, केंद्रप्रमुख अर्जुन पाटील, डी. एस. कदम, ई. ए. कुंभार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय चव्हाण, संभाजीराव देशमुखमा, माजी सरपंच वसंतराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य डी.वाय. पाटील, आशिष पवार, विश्वस्त एल.एस. बाबर उपस्थित होते.
फोटो : १०केआरडी०४
कॅप्शन : चाफळ, ता. पाटण येथील समर्थ विद्यामंदिरची विद्यार्थिनी सानिका बाबर हिचा वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला.