किल्ले भूषणगडावर राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:22 PM2019-09-27T22:22:50+5:302019-09-27T22:25:35+5:30
आजच्या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट असे की, येत्या नवरात्रोत्सवाआधी गडावर प्लास्टिक कचरा होऊ नये म्हणून भूषणगडावरील हरणाईदेवी मंदिर परिसर आणि गडावरील इतर परिसरात मार्गदर्शक फलक लावणे, गड स्वच्छता आणि गडावरील दगडी बांधीव विहिरीला प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी त्यावर आच्छादन घालणे असे होते
पुसेसावळी : ‘मनी धरुनी दृढ भाव। केला तो अट्टाहास शिवसंकल्पाचा।’ असा ध्यास मनात धरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचे संवर्धन करण्यास लाखो मावळे आजच्या घडीला बऱ्याच किल्ल्यांवर कार्य करीत असतात. या गडकोट किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण आणि त्यांची काळजी घेतली जाते. अशाच गडकोट किल्ल्यांचा स्वच्छतेचा ध्यास मनी धरून किल्ले भूषणगड येथे गुरुवारी शिवसंकल्प परिवाराने मोहीम घेण्यात आली.
आजच्या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट असे की, येत्या नवरात्रोत्सवाआधी गडावर प्लास्टिक कचरा होऊ नये म्हणून भूषणगडावरील हरणाईदेवी मंदिर परिसर आणि गडावरील इतर परिसरात मार्गदर्शक फलक लावणे, गड स्वच्छता आणि गडावरील दगडी बांधीव विहिरीला प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी त्यावर आच्छादन घालणे असे होते.
गुरुवारी सकाळी ध्येयमंत्र आणि शिवगर्जनेने मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सर्वात अदोगर गडावर असणाºया चौकोनी बांधीव दगडी विहिरीत प्लास्टिक कचरा जाऊन विहिरीत घाणीचे साम्राज्य होऊ नये म्हणून त्यावर आच्छादन घालण्याचे काम हाती घेतले.
या कार्यात त्या ऐतिहासिक वास्तूला कोणताही धक्का होऊ नये, अशा खबरदारीने विहिरीच्या चारी बाजूने तारेचे स्ट्रक्च र तयार करून त्यावर ग्रीन शेडनेटचे कापड बसविण्यात आले. जेणेकरून त्यात कोणताही कचरा जाणार नाही. त्यानंतर गडावरील सर्व परिसरात फिरून हाती लागेल तो सर्व प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला.
वीस मावळ्यांनी घेतला सहभाग..!
- या मोहिमेस शिवसंकल्प परिवाराच्या २० मावळ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यात कºहाड, म्हासुर्णे, पळशी, रहिमतपूर येथून मावळ्यांनी हजेरी लावली. या मोहिमेस हरणाईदेवी ट्रस्टच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य करून आजची मोहीम सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यास मदत केली. अशा पद्धतीने शेवटी शिवघोष करून ही मोहीम सफलतेने पूर्ण केली.