संजीवराजेंना मिळणार मुदतवाढ : राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:51 PM2019-12-28T18:51:31+5:302019-12-28T18:53:44+5:30

याच बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे, सुरेंर्द्र गुदगे आणि दीपक पवार या तिघांची नावे अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आली तर उपाध्यक्षपद हे वाई किंवा कोरेगाव तालुक्याला देण्याचे निश्चित झाले आहे. एक जानेवारीला अध्यक्षपद निवडीसाठी सभा आयोजित केली जाणार आहे.

Sanjivarajan to get extension: Nationalist leaders signal! | संजीवराजेंना मिळणार मुदतवाढ : राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संकेत !

संजीवराजेंना मिळणार मुदतवाढ : राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संकेत !

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्षपद ; मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार यांच्या नावाबाबत चर्चा

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना मुदतवाढ मिळण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शनिवारी दिले. संजीवराजेंनी मागणी केली नसली तरी त्यांचा अनुभव दांडगा असल्याने तसेच त्यांच्या कार्यकाळात एकही आरोप झाला नसल्याने त्यांना पुन्हा अध्यक्षपदावर मुदतवाढ दिली जाण्याची अशी शक्यता आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे दि. १ जानेवारी रोजी निवड केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये रामराजे तसेच शशिकांत शिंदे यांनी अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची कमरा बंद चर्चा केली. तसेच जिल्हा परिषद सदस्यांची मते जाणून घेतली. फलटणमधील सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी या बैठकीत केली.

याच बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे, सुरेंर्द्र गुदगे आणि दीपक पवार या तिघांची नावे अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आली तर उपाध्यक्षपद हे वाई किंवा कोरेगाव तालुक्याला देण्याचे निश्चित झाले आहे. एक जानेवारीला अध्यक्षपद निवडीसाठी सभा आयोजित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्यावतीने आपल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना मी व्हीप बजावली आहे.

दरम्यान, शनिवारी झालेल्या कमरा बंद चर्चेच्या अनुषंगाने पत्रकारांना माहिती देताना माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, 'जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असणाºया सदस्यांची संख्या मोठी आहे. परंतु पक्षाशी निष्ठा ठेवणारे, पक्षासाठी वेळ देणारे जे सदस्य असतील त्यांचाच पदाधिकारी पदासाठी विचार केला जातो. अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे आणि दीपक पवार या चौघांची नावे या बैठकीत समोर आली आहेत. तसेच उपाध्यक्षपद कोरेगाव आणि वाई या दोन तालुक्यांतून मागणी करण्यात आली आहे.

या बैठकीत झालेल्या चचेर्चा अहवाल पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार, आमदार अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर ठेवला जाईल. पक्षाचे वरिष्ठ नेते यावर चर्चा करून निर्णय घेतील. मात्र संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सलग अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळत त्यांच्या कार्यकाळात एकही तक्रार झाली नाही, ते अनुभवी व्यक्ती आहेत. ते स्वत: इच्छुक नसले तरी अध्यक्षपद त्यांना देण्यात यावं, यासाठी जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्य तसेच नेतेमंडळींनी आग्रह धरला आहे.

पक्षाचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब भिलारे, मनोज पवार, जयवंत भोसले, सत्यजित पाटणकर आदींशी रामराजेंनी सविस्तर चर्चा केली.


शिवेंर्द्रसिंहराजेंनी घेतली रामराजेंची भेट
जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यावर झालेल्या बैठकीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अनुपस्थित होते. मात्र बैठक संपल्यानंतर रामराजे शासकीय विश्रामगृहावर गेले. संजीवराजे हे त्यांच्यासोबत होते. त्याचवेळी आमदार शिवेंर्द्रसिंहराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली. या तिघांमध्ये कमराबंद चर्चा झाल्याने चचेर्तील तपशील समजू शकला नाही.
 

  • प्रदेशाध्यक्ष काय मंत्रिपदासाठी माझं नाव : शिंदे


प्रदेशाध्यक्षपदासाठी आपलं नाव काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. याबाबत छेडले असता आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, 'माझं नाव अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, याबाबत पक्षांतर्गत कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रदेशाध्यक्ष काय मंत्रिपदासाठी ही माझे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने माज्यावर सोपवली आहे. याठिकाणी पक्षाची सत्ता आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवली जाणार आहे, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.

  • उपाध्यक्षपद वाई किंवा कोरेगावला

प्रादेशिक समतोल राखून पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद वाई विधानसभा मतदारसंघ किंवा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दिले जाणार आहे. वाईमधून उदय कबुले यांचे नाव चर्चेत असून, कोरेगाव तालुक्यातून जयवंत भोसले किंवा मंगेश धुमाळ यांच्या एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Sanjivarajan to get extension: Nationalist leaders signal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.