संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा फलटण पंचायत समितीतर्फे सत्कार

By admin | Published: June 19, 2017 04:55 PM2017-06-19T16:55:26+5:302017-06-19T16:55:26+5:30

सर्व प्रश्नांवरचे उत्तर म्हणजे संजीवराजे : दीपक चव्हाण

Sanjivaraje Naik-Nimbalkar felicitated by the Phaltan Panchayat Samiti | संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा फलटण पंचायत समितीतर्फे सत्कार

संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा फलटण पंचायत समितीतर्फे सत्कार

Next

आॅनलाईन लोकमत

फलटण , दि. १९ : जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्षम काम करण्यासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याशिवाय पर्याय नाही. सर्वांना न्याय देण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. फलटण तालुक्याला संजीवराजेंच्या नेतृत्त्वाचा सार्थ अभिमान असून अनेक प्रश्नांवरचे एकच उत्तर म्हणजे संजीवराजे, असे गौरवोद्गार आमदार दीपक चव्हाण यांनी काढले.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा फलटण पंचायत समितीच्या वतीने येथील गोविंदबाग मंगल कार्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, गट विकास अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा परिषद सदस्या उषादेवी गावडे, कांचनमाला निंबाळकर, भावनाताई सोनवलकर, विश्वासराव गावडे, संभाजीराव निंबाळकर, बाळासाहेब ठोंबरे, सचिन रणवरे, नानासाहेब लंगुटे, संजय कापसे, प्रतिभा धुमाळ, बाबासाहेब खरात, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, दत्तात्रय गुंजवटे, राजेंद्र भोसले, रेखाताई खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

संजीवराजे म्हणाले, ह्ययंदाच्या वर्षी वरुणराजाची कृपा होताना दिसत आहे. तरीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीबरोबरच झाडे जगवण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानात फलटण तालुका मागे न राहता जिल्ह्यात अव्वलस्थानी रहाण्याच्या दृष्टीने आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

शाळांमध्ये डिजिटल शिक्षणपद्धती पोहोचवण्यासाठीही प्रयत्न करावेत. ज्याप्रमाणे शरद पवार अधिकाऱ्यांना नेहमी बरोबर घेऊन काम करतात काम करण्याची तीच पद्धत जर सर्व सदस्यांनी वापरली तर तालुक्यात निश्चितपणे चांगले काम उभे राहील. शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून सर्वच क्षेत्रात तालुका कसा पुढे जाईल, यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्नशील राहावे.ह्ण असे आवाहनही संजीवराजे यांनी केले. कार्यक्रमाचे सचिन चौकुले,स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नानासाहेब लंगुटे यांनी आभार मानले.

Web Title: Sanjivaraje Naik-Nimbalkar felicitated by the Phaltan Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.