सातारा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक- निंबाळकर 

By दीपक देशमुख | Published: September 26, 2023 06:12 PM2023-09-26T18:12:58+5:302023-09-26T18:14:13+5:30

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात ...

Sanjivraje Naik- Nimbalkar as District President of Satara Nationalist Congress Party Ajit Pawar Group | सातारा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक- निंबाळकर 

सातारा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक- निंबाळकर 

googlenewsNext

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष बळकटीसाठी लवकरच पुढील निवडी जाहीर करण्यात येणार आहेत. संजीवराजेंच्या निवडीनंतर फलटण शहरात तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

तीस वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यासोबतच अनेक पदांवर आपला ठसा उमटवलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Sanjivraje Naik- Nimbalkar as District President of Satara Nationalist Congress Party Ajit Pawar Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.