‘संकल्प’ शाळेचा अभिनव उपक्रम

By admin | Published: March 25, 2015 10:36 PM2015-03-25T22:36:40+5:302015-03-26T00:09:01+5:30

अमित कदम: जिल्हा परिषद; दहा लाखांची तरतूद, दोन कोटींचा निधी लागणार

'Sankalp' school's innovative venture | ‘संकल्प’ शाळेचा अभिनव उपक्रम

‘संकल्प’ शाळेचा अभिनव उपक्रम

Next

सातारा : दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणासाठी संकल्प शाळेचा अभिनव उपक्रम सातारा जिल्हा परिषद येत्या वर्षात राबविणार आहे. या उपक्रमासाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित असून, जिल्हा परिषदेने अंदाजपत्रकामध्ये दहा लाखांची तरतूद केली आहे. कृषी पर्यटनासारख्या वेगळ्या उपक्रमाद्वारे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमित कदम यांनी सांगितले. अंदाजपत्रकाच्या मंजुरीनंतर पत्रकारांशी बोलताना अमित कदम यांनी ही माहिती दिली. ‘यशवंतराव चव्हाण यांची मार्गदर्शक तत्त्वे समोर ठेवून जिल्हा परिषद काम करत आहे. बहुजन समाजाला केंद्रबिंदू मानून नावीन्यपूर्ण योजना राबविण्यावर आमचा भर राहील. दुर्गम व डोंगराळ भागातील शाळा बंद होत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी बामणोली येथे संकल्प शाळेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ५ किलोमीटर अंतरामधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. वस्तीशाळेच्या धर्तीवर हा उपक्रम राबविला जाईल. ग्रामीण भागातील मुले स्पर्धेत टिकण्यासाठी जे काही दर्जेदार शिक्षण द्यावे लागेल. ते तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून दिले जाईल. या योजनेसाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेने दहा लाखांची तरतूद केली असून, उर्वरित निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळविला जाणार आहे. बामणोली येथील संकल्प शाळेचा उपक्रम यशस्वी झाल्यास रोल मॉडेल म्हणून तो जिल्हाभर राबविला जाईल.’
प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक केंद्र शाळांच्या परिसरात सौरदिवे बसविण्यात येणार आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृहासाठीही दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. कृषी साहित्य, औजारे, बी-बियाणे पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. शंभर लाखांच्या तरतूद कृषी विभागासाठी करण्यात आली आहे. अभ्यास दौऱ्यासाठीची तरतूद कमी करून शेतकऱ्यांना आपत्कालीन सहायता निधी देण्यात येणार आहे. थोर पुरुषांच्या पुण्यतिथी व जयंती यासाठी चार लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने नवीन संकल्पना राबविल्या जाणार आहेत. यासाठी २८५.९१ लाखांची तरतूद केली आहे. महिला व समाजकल्याण विभागासाठी १०४.४२ लाखांच्या केलेल्या तरतुदीतून महिलांना घरगुती व्यवसायाच्यानिमित्त नवीन व्यवसाय व व्यावसायिक साधन देणे व महिलांचा आर्थिक विकास व सामाजिक विकास घडवून आणणे. याकरिता निश्चित धोरण आखले जाणार आहे.
नवीन अंगणवाड्या विकसित, कुपोषित बालकांचा दर कमी करणे व नवी पिढी सक्षम करण्यासाठीही जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


प्रतापसिंह शेतीशाळेत
कृषी पर्यटन केंद्र
कृषी पर्यटनाला चालना देऊन व जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी साताऱ्यातील प्रतापसिंह महाराज शेती शाळेत कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. सहकारी संस्था, खासगी संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाईल, हा दिशादर्शक उपक्रम ठरणार आहे. हा जिल्ह्यातला पहिला शासकीय कृषी पर्यटन विकास उपक्रम ठरणार आहे.

Web Title: 'Sankalp' school's innovative venture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.