संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार, सातारा जिल्ह्यात किती दिवसाचा मुक्काम.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: June 17, 2024 07:21 PM2024-06-17T19:21:40+5:302024-06-17T19:22:59+5:30

सातारा : लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार आहे. हा सोहळा दि. ...

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla will start from June 29, will have five stops in Satara district | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार, सातारा जिल्ह्यात किती दिवसाचा मुक्काम.. जाणून घ्या

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार, सातारा जिल्ह्यात किती दिवसाचा मुक्काम.. जाणून घ्या

सातारा : लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार आहे. हा सोहळा दि. ६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन करणार आहे. यावर्षी सोहळ्याचे जिल्ह्यात पाच मुक्काम राहणार आहेत. तर ११ जुलै रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

आळंदी येथून दि. २९ जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू होणार आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातन प्रस्थान करत सोहळा पंढरपूरला जातो. दि. ६ जुलै रोजी पालखी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात प्रवेश करणार आहे. रात्रीचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. तर दि. ७ रोजीही लोणंद येथेच मुक्काम असेल. तर दि. ८ जुलै रोजी सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन पालखी लोणंद येथून मार्गस्थ हेाईल.

दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल. तर मुक्काम तरडगाव, ता. फलटण येथे होणार आहे. ९ जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा आणि विसावा वडजल येथे राहील. त्यानंतर रात्रीचा मुक्काम फलटण येथे राहणार आहे.

दि. १० जुलै रोजी सकाळी फलटण येथून पालखीचे प्रस्थान होईल. सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, विसावा निंबळक फाटा येथे असेल. तर रात्रीचा मुक्काम बरड येथे असणार आहे. दि. ११ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशासाठी बरड येथून पालखीचे प्रस्थान होईल.

त्यानंतर सकाळचा विसावा साधबुवाचा ओढा तर दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ होईल. त्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. सोलापूरमधील रात्रीचा मुक्काम हा माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे राहणार आहे.

Web Title: Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla will start from June 29, will have five stops in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.