संतोष पोळने तीन खून माझ्यासमोर केले; ज्योती मांढरेची साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 05:19 AM2020-12-20T05:19:19+5:302020-12-20T05:19:42+5:30

Santosh Pol : संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणाऱ्या वाई-धोम हत्याकांड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकार पक्षातर्फे काम पाहत  होते.

Santosh Pol committed three murders in front of me; Evidence of Jyoti Mandhare | संतोष पोळने तीन खून माझ्यासमोर केले; ज्योती मांढरेची साक्ष

संतोष पोळने तीन खून माझ्यासमोर केले; ज्योती मांढरेची साक्ष

googlenewsNext

सातारा : संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगला जेधे, सलमा शेख, नथमल भंडारी यांचा इंजेक्‍शन देऊन खून केला असून, त्यानंतर आनंद व्यक्त केला, तसेच बहुतेक खून हे पोळने सोने व पैशाच्या हव्यासापोटी केल्याची साक्ष वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात दिली. दरम्यान, पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगला यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणाऱ्या वाई-धोम हत्याकांड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकार पक्षातर्फे काम पाहत  होते.
मी पोळच्या संपर्कात येण्यापूर्वीच त्याने तीन खून केले होते, तर मी संपर्कात आल्यानंतर मंगला जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांचे खून केले. यातील बहुतेक खून हे पोळ याने पैशाच्या हव्यासापोटीच केल्याची साक्ष ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली. शनिवारी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी ज्योतीची साक्ष घेतली. त्यानंतर, पोळचे वकील श्रीकांत हुडगीकर यांनी उलट तपासणीला सुरुवात केली, परंतु न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने पुढील सुनावणी २ जानेवारीला होणार आहे. 

Web Title: Santosh Pol committed three murders in front of me; Evidence of Jyoti Mandhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.