मलकापुरातील शारदा लोकरे यांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:11+5:302021-01-18T04:35:11+5:30

मलकापूर येथे स्थायिक असलेल्या शारदा लोकरे यांचे मूळ गाव तारूख आहे. २००७ मध्ये त्यांचे पती रामचंद्र लोकरे यांचे निधन ...

Sarada Lokare from Malkapur honored with Adarsh Mata Award | मलकापुरातील शारदा लोकरे यांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव

मलकापुरातील शारदा लोकरे यांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव

Next

मलकापूर येथे स्थायिक असलेल्या शारदा लोकरे यांचे मूळ गाव तारूख आहे. २००७ मध्ये त्यांचे पती रामचंद्र लोकरे यांचे निधन झाल्यावर न डगमगता त्यांनी संसाराचा गाडा व शिक्षकीपेशा खंबीरपणे सांभाळला. रोजच्या नवीन आव्हानांबरोबर घर, शाळा, शेतकाम करत दोन लहान मुलांना घडवले. त्यांच्या कन्येला बीई. इलेक्ट्रिकलचे शिक्षण दिले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेद्वारे विक्रीकर निरीक्षक पदावर तिची निवड झाली असून सध्या जीएसटी भवन मुंबई येथे ती सेवा बजावत आहे. तर शारदा लोकरे यांचा मुलगा बीएससीचे शिक्षण घेत आहे. शारदा लोकरे या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या उपशिक्षिका आहेत. त्यांना २०१९-२० चा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक व मलकापूर पालिकेचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रस्तरीय इंग्रजी आदर्श वर्ग प्रथम क्रमांक, स्कॉलरशिप परीक्षेचा १०० टक्के निकाल, प्रभारी मुख्याध्यापक असताना आगाशिवनगर शाळा क्र. १ ला मानांकन प्राप्त, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध परीक्षेत अनेक विद्यार्थी पात्र ठरवून चांगली कामगिरी बजावली. या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या वेळी समता परिषदेच्या प्रवक्त्या कविता म्हेत्रे, बहुजन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण लादे, जिल्हा सचिव उदय भंडारे, जिल्हा उपाध्यक्ष शबाना संदे, कऱ्हाड तालुका अध्यक्ष सुरेखा वायदंडे, सचिव महेश लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उदय भंडारी व नलिनी बेले यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यधन बामणे यांनी आभार मानले.

फोटो : १७केआरडी०१

कॅप्शन : मलकापूर येथील शारदा लोकरे यांना जिजाऊ जन्मोत्सव आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी कविता म्हेत्रे, प्रवीण लादे, उदय भंडारे, शबाना संदे, सुरेखा वायदंडे, महेश लोखंडे उपस्थित होते.

Web Title: Sarada Lokare from Malkapur honored with Adarsh Mata Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.