गोपूज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरिता घार्गे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:45 AM2021-03-01T04:45:50+5:302021-03-01T04:45:50+5:30
औंध : राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणाऱ्या गोपूज ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत सरिता सुरेश घार्गे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी संतोष कमाने ...
औंध : राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणाऱ्या गोपूज ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत सरिता सुरेश घार्गे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी संतोष कमाने यांची निवड झाली. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.
एकूण नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. सरपंचपदासाठी सरिता घार्गे व चंद्रकात खराडे यांच्यात लढत झाली. सरिता घार्गे यांना पाच मते मिळाली, तर चंद्रकांत खराडे यांना तीन मते मिळाली, तर एक मत बाद झाले.
उपसरपंचपदासाठी संतोष कमाने व मंगल घार्गे यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये संतोष कमाने यांना पाच, तर मंगल घार्गे यांना चार मते मिळाली. सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीत उमा घार्गे, नीलम घार्गे, मनीषा जाधव यांचे सहकार्य मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. सानप यांनी काम पाहिले; तर ग्रामसेवक सुनील राजगुरू यांनी त्यांना सहकार्य केले.
विजयी उमेदवारांचे जयंत घार्गे, दिलीप घार्गे, संभाजी घार्गे, सत्यवान कमाने, चंद्रकांत घार्गे, हेमंत जाधव, अशोकराव पाटणकर, प्रशांतशेठ जाधव, पृथ्वीराज घार्गे, उमेश घार्गे, श्रीरंग घार्गे, बाळासाहेब चव्हाण, वसंतराव घार्गे, सुनील खराडे, अनिल घार्गे, विक्रमसिंह घार्गे, संतोष घार्गे, दस्तगीर मुल्ला, सचिन देशमुख, रोहन घार्गे, बाबू मुल्ला, विजय कणसे, रामदास घार्गे, महेंद्र घार्गे, कृष्णात जाधव, विठ्ठल पडळकर, सत्यवान घार्गे, सुनील घार्गे, आदींसह ग्रामस्थांनी कौतुक केले.
२८गोपूज
गोपूज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरिता घार्गे व उपसरपंचपदी संतोष कमाने यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला. (छाया : रशीद शेख)