‘प्राज्ञपाठ’च्या अध्यक्षपदी सरोजा भाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:31 AM2021-01-09T04:31:43+5:302021-01-09T04:31:43+5:30

वाई : येथील प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सरोजा भाटे यांची एक मताने निवड झाली. उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र ...

Saroja Bhate as the President of 'Prajnapath' | ‘प्राज्ञपाठ’च्या अध्यक्षपदी सरोजा भाटे

‘प्राज्ञपाठ’च्या अध्यक्षपदी सरोजा भाटे

Next

वाई : येथील प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सरोजा भाटे यांची एक मताने निवड झाली. उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर व सचिव म्हणून अनिल जोशी व सहसचिवपदी भालचंद्र मोने यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे विश्वस्त डॉ. शरद अभ्यंकर होते. वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमतेही निवड करण्यात आली. प्राज्ञपाठ शाळा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त डॉ. शरद अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नवीन संचालक मंडळामध्ये डॉ. शंतनू अभ्यंकर, विवेक सावंत, डॉ. भाग्यलता पाटसकर, मोहन काकडे, डॉ. राजेंद्र प्रभुणे, भालचंद्र मोने, मदन प्रतापराव भोसले, डॉ. अनिमिष चव्हाण, नंदकुमार बागवडे या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली.

स्वीकृत सदस्य म्हणून वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी, मदनकुमार साळवेकर व शिवाजी राऊत यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या मासिकासाठी नवीन संपादक मंडळाची स्थापना करण्यात आली. प्रमुख संपादक म्हणून डॉ. राजा दीक्षित, कार्यकारी संपादक अनिल जोशी व नवीन संपादक मंडळामध्ये अशोक कृष्णाजी जोशी, किशोर बेडकिहाळ, डॉ. शंतनू अभ्यंकर व डॉ. राजेंद्र प्रभुणे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

Web Title: Saroja Bhate as the President of 'Prajnapath'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.