Satara: रेठरे बुद्रूक येथे सरपंच पदाच्या उमेदवारावर हल्ला, सख्ख्या चुलत्या पुतण्यांत हाय व्होल्टेज लढत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:01 PM2023-10-30T12:01:28+5:302023-10-30T12:01:49+5:30

कऱ्हाड : रेठरे बुद्रूक गावाची ग्रामपंचायत निवडणूक सुरू असून सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे ...

Sarpanch candidate attacked in Rethere Budruk, high voltage fight between many cousins | Satara: रेठरे बुद्रूक येथे सरपंच पदाच्या उमेदवारावर हल्ला, सख्ख्या चुलत्या पुतण्यांत हाय व्होल्टेज लढत 

Satara: रेठरे बुद्रूक येथे सरपंच पदाच्या उमेदवारावर हल्ला, सख्ख्या चुलत्या पुतण्यांत हाय व्होल्टेज लढत 

कऱ्हाड : रेठरे बुद्रूक गावाची ग्रामपंचायत निवडणूक सुरू असून सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे सरपंच पदाचे उमेदवार दिग्विजय अशोकराव सूर्यवंशी व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले गटाचे उमेदवार हणमंत बाबूराव सूर्यवंशी या दोन सख्ख्या चुलत्या पुतण्यांत हाय व्होल्टेज लढत होत आहे.

अशा परिस्थितीत भोसले गटाचे समर्थक हेमंत पांडुरंग धर्मे यांनी सरपंच पदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना रेठरे बुद्रूक येथील बालाजी नगर परिसरात प्रचार करताना धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानंतर कऱ्हाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी खबरदारी घेत रेठरे बुद्रूक येथे दोन्ही गटाच्या उमेदवारांची तत्काळ बैठक घेतली.

Web Title: Sarpanch candidate attacked in Rethere Budruk, high voltage fight between many cousins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.