खटाव तालुक्यातील सरपंच फेर आरक्षण सोडत.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:07+5:302021-02-23T04:59:07+5:30
वडूज : खटाव तालुक्यातील १३३ पैकी १२० गावकारभारी ठरविण्यासाठी पंचायत समितीच्या बचत सभागृहात फेर आरक्षण सोडत काढण्यात आली. लोकसंख्येच्या ...
वडूज : खटाव तालुक्यातील १३३ पैकी १२० गावकारभारी ठरविण्यासाठी पंचायत समितीच्या बचत सभागृहात फेर आरक्षण सोडत काढण्यात आली. लोकसंख्येच्या निकषावर २९ जानेवारीला काढण्यात आलेल्या सोडतीतील वरुड, पुसेगाव, डाळमोडी, मोळ, चितळी, विखळे येथील अनुसूचित जाती व विसापूर, माने-तुपेवाडी, बनपुरी, मुळीकवाडी, ललगुण, डिस्कळ येथील ग्रामपंचायतीसाठी. अनुसूचित जाती महिला हे आरक्षण कायम ठेवत उर्वरित १२० ग्रामपंचायत साठी सोमवारी सोडत काढण्यात आली.
त्यामध्ये प्रवर्गनिहाय व गाववार निघालेली सोडत अशी : सर्वसाधारण खुला प्रवर्ग : डांभेवाडी, गारळेवाडी, पारगाव, वांझोळी, कटगुण, तरसवाडी, पाचवड, गणेशवाडी, शिरसवडी, पडळ, मरडवाक, अनफळे, पांढरवाडी, फडतरवाडी (नेर), रणसिंगवाडी, गिरजाशंकर वाडी, औंध, मोराळे, नडवळ, अनपटवाडी, खातवळ, नेर, गोपूज, नांदोशी, सिद्धेश्वर कुरोली, एनकुळ, निमसोड, दहिवड, लोणी, भूषणगड, जायगाव, अंभेरी, कोकराळे, चिंचणी, गारुडी, शेनवडी, मुसांडवाडी, पेडगाव, गुंडेवाडी, मांजरवाडी, जाखणगाव, चोराडे.
सर्वसाधारण महिला : ढोकळवाडी, होळीचागाव, वडी, पिंपरी, लाडेगाव, निढळ,सातेवाडी, राजाचे कुर्ले, कातरखटाव, बोंबाळे, उंचीठाणे, कान्हरवाडी,अंबवडे, मायणी, हिंगणे, हिवरवाडी, दातेवाडी, यलमरवाडी, पळसगाव, कलेढोण, गोरेगाव (निम), वर्धनगड, सूर्याची वाडी, उंबर्डे, फडतरवाडी (बुध), नवलेवाडी, नायकाचीवाडी, पांघरखेल, गारवडी, पुनवडी, रेवली, वाकळवाडी, पोपळकरवाडी, शिंदेवाडी उंबरमळे, राजापूर, भुरकवडी, करांडेवाडी.
चिठ्ठीवर निघालेल्या ग्रामपंचायतीमध्ये : कामथी, दरुज, कणसेवाडी, लांडेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागरिकाचा मागास प्रवर्गातून वेटणे, रहाटणी, धोंडेवाडी, वाकेश्वर, येरळवाडी, गुरसाळे, कळंबी, जांब, पुसेसावळी, तडवळे, धारपुडी, त्रिमली, गोसाव्याची वाडी, नागनाथ वाडी, रेवलकरवाडी, गादेवाडी, खबालवाडी, धकटवाडी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बुध, खटाव, भोसरे, पळशी, दरजाई, खरशींगे, कातळगेवाडी, पवारवाडी, गोरेगाव वांगी, काटेवाडी, येळीव, म्हासुर्णे, वडगाव (ज. स्वा), काळेवाडी, खातगुण, नागाचे कुमठे, कानकात्रे येथील ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.
फोटो : २२वडूज-सरपंच
खटाव तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडती सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. (छाया : शेखर जाधव )