अबब..सासनकाठी डोक्यावर घेऊन उचलली जमिनीवरील पैशाची नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 01:48 PM2021-12-10T13:48:22+5:302021-12-10T13:54:43+5:30

कोपर्डे हवेली येथील सिध्दनाथ देवाचे पुजारी कृष्णत गुरव यांनी म्हसवड येथील नागोबा मंदिरात सिध्दनाथ देवाची सासनकाठी डोक्यावर घेऊन शिंग वाजवत जमिनीवर ठेवलेली पैशाची नोट जिभेवर घेऊन कौशल्याने उचलली.

Sasankathi picked up the money note on the ground with his head in Koparde Haveli satara district | अबब..सासनकाठी डोक्यावर घेऊन उचलली जमिनीवरील पैशाची नोट

अबब..सासनकाठी डोक्यावर घेऊन उचलली जमिनीवरील पैशाची नोट

googlenewsNext

शंकर पोळ

कोपर्डे हवेली : धार्मिक कार्यक्रमामध्ये सासनकाठीला महत्व आहे. यात्रेमध्ये सासनकाठीवर श्रध्देने चांगभलच्या गजरात भाविक गुलाल खोबऱ्यांची उधळण करतात. त्यावळी हौसेने अनेक भाविक उंचच्या उंच सासनकाठी नाचवत असतात. ही सासनकाठी नाचवण आणि ती सांभाळण म्हणजे जिकरीचेच. मात्र, कोपर्डे हवेली येथील सिध्दनाथ देवाचे पुजारी कृष्णत गुरव यांनी म्हसवड येथील नागोबा मंदिरात सिध्दनाथ देवाची सासनकाठी डोक्यावर घेऊन शिंग वाजवत जमिनीवर ठेवलेली पैशाची नोट जिभेवर घेऊन कौशल्याने उचलली.

म्हसवडच्या यात्रेसाठी प्रत्येक वर्षी कोपर्डे हवेलीची सिध्दनाथ देवाची सासनकाठी रथाला भेटण्यासाठी जात असते. या सासनकाठीला रथाला भेटण्याचा मान आहे. म्हसवडच्या रथोत्सवासाठी सासनकाठीबरोबर पायी भाविक चालत जातात. म्हासुर्णे, कुकडवाड असे दोन मुक्काम असतात. यंदाच्या यात्रेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोगोबा मंदिर येथे मुक्काम होता.

सासन काठीची उंची चाळीस फूट

सासन काठीची उंची चाळीस फूट असून ती वजनाने जाड आहे. काठीला चार तोरण्या, पोशाख, फरारा, वणगायच्या शेपटाच्या केसाचा गोंडा, काठी नाचवण्यासाठी लाकडी बसणे असते. त्यावर मुर्ती सिध्दनाथ देवाची मूर्ती आहे. ही सासनकाठी ठिकठिकाणी नाचवण्यात येते. ताल येण्यासाठी हालगी वाजवली जाते. त्या ठेक्यावर सासनकाठी नाचते काही भाविक खाद्यावर घेऊन नाचतात तर काही डोक्यावर घेऊन नाचवतात.
म्हसवड आणि नागोबा मंदिर हे दोन किलोमीटरचे अंतर आहे. कृष्णत पुजारी यांनी नागोबाच्या मुक्कामी शिंग वाजवत हालगीच्या ठेक्यावर ताल धरत जमिनीवर ठेवलेली पैशाची नोट जिभेवर घेऊन कौशल्याने उचलली. यावेळी सिध्दनाथ देवाचे पुजारी महादेव गुरव, दत्ता गुरव, बारा बलुतेदार तसेच ग्रामस्थ, भाविक, उपस्थित होते.

सासनकाठी नाचविण्यासाठी ताकतीपेक्षा कौशल्याची गरज

अनेक गावांत यात्रेच्यावेळी सासनकाट्या भाविक नाचवत असतात. या काठ्या कमी जास्त उंचीच्या असतात. त्याला नवसाच्या नारळाचे तोरण बांधले जाते. काठीचा तोल सांभाळण्यासाठी तोरण्या असतात. काठी नाचवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ती नाचविण्यासाठी ताकतीपेक्षा कौशल्य असावे लागते.



सासनकाटी नाचवत असताना मनाची एकाग्रता आणि कौशल्याची गरज असते. त्यासाठी तोरण्या धरणाऱ्यांचीही साथ असावी लागते. तरच ती नाचवता येते. ताकदीपेक्षा कौशल्य महत्त्वाचे आहे. - कृष्णत गुरव, कोपर्डे हवेली.

Web Title: Sasankathi picked up the money note on the ground with his head in Koparde Haveli satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.