सातारा : अतीउच्च वीजदाबाचा १२ कुटुंबांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:59 PM2018-05-16T12:59:53+5:302018-05-16T12:59:53+5:30
मायणी येथील इंदिरानगर परिसरामध्ये बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अतीउच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने १२ कुटुंबांना मोठा फटका बसला. यामध्ये ४ टीव्ही, १ फ्रीज, ४ पंखे व ३ घरातील संपूर्ण लाईट फिटिंग जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मायणी : येथील इंदिरानगर परिसरामध्ये बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अतीउच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने १२ कुटुंबांना मोठा फटका बसला. यामध्ये ४ टीव्ही, १ फ्रीज, ४ पंखे व ३ घरातील संपूर्ण लाईट फिटिंग जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, मायणी, ता. खटाव येथील इंदिरानगर परिसरात असणाऱ्या बेघर वस्तीमध्ये बुधवारी अतिउच्च दाबाने वीजपुरवठा झाला. याचा फटका या परिसरात राहणाऱ्या १२ कुटुंबांना बसला.
यामध्ये शालन माने, मेहबुब नदाफ, शफीक बागवान, प्रकाश भिसे यांचे टीव्ही. राजेश खैरमोडे यांचा सेटअप बॉक्स, रवी भिसे, राजू कमाने, प्रशांत माने, दशरथ जाधव यांचे पंखे. सुनील बनसोडे होम थिएटर, प्रशांत माने फ्रीज, कुंडलिक जाधव यांच्या घरातील सर्व बल्ब, राजू कमाने यांच्या घरातील सर्व लाईट फिटिंग अशा सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन माहिती घेतली.
मायणी येथील अती उच्चदाब घटनेची चौकशी करून त्याचा पंचनामा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर तो वरिष्ठांना सादर करून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न केले जातील.
- ए. डी. लोखंडे,
सहाय्यक अभियंता, मायणी