सातारा : माण तालुक्यात गाडेवाडीतील १७ बंधारे फुल्ल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:32 PM2018-06-09T13:32:54+5:302018-06-09T13:32:54+5:30
माण तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. कुळकजाई, गाडेवाडी, कळसकरवाडी, शिंदी, भांडवली, मलवडी, आंधळी या गावांना पावसाचा तडाखा बसला असून तेथे तब्बल ६० मिलीमीटर पाऊस पडला. तर गाडेवाडी येथील १७ बंधारे पाण्याखाली गेले.
दहिवडी : माण तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. कुळकजाई, गाडेवाडी, कळसकरवाडी, शिंदी, भांडवली, मलवडी, आंधळी या गावांना पावसाचा तडाखा बसला असून तेथे तब्बल ६० मिलीमीटर पाऊस पडला. तर गाडेवाडी येथील १७ बंधारे पाण्याखाली गेले.
माण तालुक्यातील डंगीरेवाडी, कुकडवाड, नरवणे, दिवड, धामणी, वडजल या गावात जोरदार पाऊस झाला असून तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. अनेक गावात वॉटर कप स्पर्धे अंतर्गत काम झाले असून तेथील सीसीटी, डिपसीसीटी, नालाबांध, पाझर तलाव भरुन वाहिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी माण तालूक्याच्या पूर्व भागाला पावसाने झोडपले होते. गुरूवारी सायंकाळनंतर पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस दिलासा देणारा आहे.