Satara: काशीळ येथील जुगार अड्ड्यावर २७ जण सापडले, बोरगाव पोलिसांची कारवाई

By दत्ता यादव | Published: March 3, 2024 01:52 PM2024-03-03T13:52:39+5:302024-03-03T13:52:59+5:30

Satara Crime News: काशीळ, ता. सातारा येथे एका शेतात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून २७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड, जुगाराचे साहित्य आणि मोबाइल, वाहने, असा सुमारे १७ लाख ८३ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

Satara: 27 people were found at a gambling den in Kashil, action of Borgaon police | Satara: काशीळ येथील जुगार अड्ड्यावर २७ जण सापडले, बोरगाव पोलिसांची कारवाई

Satara: काशीळ येथील जुगार अड्ड्यावर २७ जण सापडले, बोरगाव पोलिसांची कारवाई

- दत्ता यादव
सातारा  - काशीळ, ता. सातारा येथे एका शेतात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून २७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड, जुगाराचे साहित्य आणि मोबाइल, वाहने, असा सुमारे १७ लाख ८३ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता बोरगाव पोलिसांनी केली.

लक्ष्मण मारुती यादव, वैभव विजय साळुंखे, समीर सर्जेराव भोसले, मारुती सीताराम दरवडे, दत्ता सुदाम सोनवणे, सुरेश बाळकृष्ण रोमण, विलास नानासाहेब राजेमहाडिक, गुड्डू रावत कुमार, सदानंद नारायण देवाडिगा, रोहित रामचंद्र घाडगे, शहाबुद्दीन अकबरमिया, संदीप श्रीपती गुंजले, डालू जितू पंडित, विकास भानुदास पवार, किशोर पांडुरंग बारटक्के, जयवंत रामचंद्र जाधव, दत्तात्रय शिवाजी वायदंडे, समीर साहेब पठाण, अशोक हनुमंत मोहिते, विशाल जालिंदर नरसाळे, युवराज दिलीप माने, श्रीकांत इंद्रदेव प्रसाद, रोहित मानसिंग घाडगे, अझरुद्दीन अब्दुल शेख, मोहन बाबासो शिंदे, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काशीळ, ता. सातारा येथील ‘अतिथी’ नावाच्या हाॅटेलच्या पाठीमागील शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री आठ वाजता चार पथके घेऊन तेथे पोलिसांनी अचानक छापा टाकला. त्यावेळी पोलिस आल्याचे पाहून काही जुगारी पळून गेले तर इतर २७ जण जुगार खेळताना पोलिसांना रंगेहाथ सापडले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल, वाहने, असा सुमारे १७ लाख ८३ हजारांचा ऐवज जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने काशीळ परिसरात खळबळ उडाली. या घटनेची बोरगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार सपकाळ हे अधिक तपास करीत आहेत.  

Web Title: Satara: 27 people were found at a gambling den in Kashil, action of Borgaon police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.