सातारा : प्लॉॅटचे आमिष दाखवून वृद्धाची ३६ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:51 AM2018-08-29T11:51:47+5:302018-08-29T11:55:38+5:30
प्लॉॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखवून वृद्धाची ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. महेश जयराम निकम (रा. कोडोली, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
सातारा : प्लॉॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखवून वृद्धाची ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. महेश जयराम निकम (रा. कोडोली, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
ज्ञानदेव कृष्णा यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महेश निकम याने एका बँकेतून कर्ज घेतले होते. ते भरण्यासाठी यादव यांच्याकडून ३६ लाख रुपये घेतले. त्या पैशांच्या बदल्यात महेश याने त्याचा प्लॉट नावावर करून देतो, असे सांगितले. तशी नोटरीही केली. मात्र, प्लॉट नावावर करून न देता तो आज देतो, उद्या देतो, असे म्हणून टाळाटाळ करीत आहे.
मंगळवार, दि. २८ रोजी महेशकडे पैशांची मागणी केली असता तुला काय करायचे आहे ते कर, मी पैसेही देणार नाही आणि प्लॉटही देणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत.