Satara: साताऱ्यात ढाबळ पेटवल्याने ४० कबुतरांचा मृत्यू, अज्ञाताने आग लावल्याचा संशय
By दत्ता यादव | Published: January 14, 2023 11:07 PM2023-01-14T23:07:44+5:302023-01-14T23:08:05+5:30
Satara: सातारा येथील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबल आज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री दहा वाजता समोर आली.
सातारा - येथील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबल आज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री दहा वाजता समोर आली.
याबाबत माहिती अशी की, सदर बाजार मधील लक्ष्मी टेकडी परिसरात राजेंद्र जाधव यांची कबुतरांची ढाबळ आहे. या ढाबळ मध्ये 50 हून अधिक कबूतर होते. शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास अज्ञाताने कबुतराच्या ढाबळला आग लावली .त्यामुळे ढाबळमध्ये असलेले 40 कबूतर जागीच मृत्युमुखी पडले. कबुतराच्या ढाबळला आग लागल्याचे समजताच जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ढाबळ पूर्णपणे जळून खाक झाली होती. ही आग कोणी लावली हे अद्याप समोर आले नसून घटनास्थळी सातारा पोलिसांनी धाव घेतली. जाधव यांची कोणासोबत भांडणे अथवा पूर्व वैमनश्य आहे का, याची माहितीही पोलीस घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती इतक्या मोठ्या संख्येने कबुतरांचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.