सातारा : एका तासात भरली ४१ शेततळी, रुईमध्ये शेततळ्यात उतरून ग्रामस्थांचा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:45 AM2018-06-08T11:45:53+5:302018-06-08T11:45:53+5:30

वॉटर कप स्पर्धेत समाधानकारक कामगिरी बजावलेल्या कोरेगाव तालुक्यातील रुई गावात बुधवारी वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने एका तासात तब्बल ४१ शेततळी आणि सीसीटी भरून ओढ्या, नाल्यात पाणी साठल्याने ग्रामस्थांनी या पाण्यात उतरून आंनदोत्सव साजरा केला.

Satara: 41 farmers, filled in an hour, landed in cotton and brought joy to the villagers | सातारा : एका तासात भरली ४१ शेततळी, रुईमध्ये शेततळ्यात उतरून ग्रामस्थांचा आनंदोत्सव

सातारा : एका तासात भरली ४१ शेततळी, रुईमध्ये शेततळ्यात उतरून ग्रामस्थांचा आनंदोत्सव

Next
ठळक मुद्दे एका तासात भरली ४१ शेततळीरुईमध्ये शेततळ्यात उतरून ग्रामस्थांचा आनंदोत्सव४५ दिवसांत घेतलेल्या श्रमाला अखेर फळ

वाठार स्टेशन/ सातारा : वॉटर कप स्पर्धेत समाधानकारक कामगिरी बजावलेल्या कोरेगाव तालुक्यातील रुई गावात बुधवारी वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने एका तासात तब्बल ४१ शेततळी आणि सीसीटी भरून ओढ्या, नाल्यात पाणी साठल्याने ग्रामस्थांनी या पाण्यात उतरून आंनदोत्सव साजरा केला.

वॉटर कप स्पर्धेत श्रमदानातून या गावाने मोठे काम पूर्ण केले. या कामाचे मोजमाप दोन दिवसांपूर्वी कमिटीकडून झाल्यानंतर बुधवारी वीस वर्षांनंतर एक तास मुसळधार पाऊस पडला.

या पावसामुळे ४५ दिवसांत गावकऱ्यांनी श्रमदानातून साकारलेले ३६ लहान शेततळी पूर्ण तर पाच मोठी शेततळी अशी एकूण ४१ शेततळी भरली तर सर्व सीसीटीमध्ये पाणी साठले.

या पाण्याने या गावात ग्रामस्थांनी शेततळ्याच्या पाण्यात उतरून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामस्थांनी ४५ दिवसांत घेतलेल्या श्रमाला वरुणराजा पावला, अशीच स्थिती ग्रामस्थाच्या आनंदातून दिसत आहे.

Web Title: Satara: 41 farmers, filled in an hour, landed in cotton and brought joy to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.